कऱ्हाड : कराड जनता सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने नऊ नोव्हेंबर 2017 रोजी निर्बंध लादले. त्या निर्बंधाच्या काळात ज्या व्यक्ती अस्तित्वातच नाहीत, त्यांच्या नावाने कोट्यवधींच्या अपहाराचा नवा फंडा बॅंकेत वापरला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. पाटण तालुक्यातील एकाच गावातील व घरातील सहा ठेवीदार बॅंकेत आहेत. त्यांच्या नावाने बॅंकेत लाखोंच्या ठेवी होत्या. त्या काढण्यातही आल्या. मात्र, त्या सहाही व्यक्ती सध्या गायब आहेत. पोस्ट ऑफिस, तलाठ्यांनाही त्या व्यक्ती सापडलेल्या नाहीत. बॅंकेनेही पोस्टाद्वारे त्यांना त्या पत्त्यावर पत्र पाठवले. त्या सहाही व्यक्ती त्या गावच्या रहिवासी नाहीत, असा शेरा मारून ती पत्रे परत आली. संबंधित गावच्या तलाठ्यानेही त्या सहाही व्यक्ती गावच्या रहिवासी नाहीत, असा दाखला दिला आहे. त्यामुळे ते सहा ठेवीदार नक्की कोण त्याच्या तपासाचे आव्हान आहे.
ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! वेगवेगळ्या प्रभागातून अर्ज भरु नका
कराड जनता बॅंकेत अनेक व्यवहारांत अनियमितता झाली आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेनेही नोटीस दिली आहे. निर्बंधाच्या काळात चांगले काम करणे अपेक्षित होते. मात्र, त्याही काळात बिनभोबाट कारभार केल्याचे समोर येऊ लागले आहे. ज्या काळात बॅंकेतून एक हजार रुपयांपेक्षा जादा रक्कम कोणत्याही खात्यातून वा ठेव देण्यावर बंदी होती. त्या काळात पाटण तालुत्यातील सहा वेगवेगळ्या नावाने काही खाती होती. त्या नावावरील ठेव पावत्यांमध्ये आर्थिक घोळ झाल्याची शंका व्यक्त होत आहे. ती रक्कम कोणाची होती, याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्या सहाही व्यक्तींचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्या विरोधात न्यायालयात काहींनी धाव घेतली आहे. त्या सहाही ठेवीदारांच्या आडून गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने समोर आलेल्या ठेवींच्या पावत्यांचा नवा घोळ आहे, त्याचाही स्वतंत्रपणे सहकार खात्याला शोध घ्यावा लागणार आहे. सहाही व्यक्ती नक्की कोण आहेत. त्यांच्या नावावर नक्की कोणी पैसे ठेवले, ते पैसे कोणाचे होते, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचे कोडे अद्यापही कायम आहे. त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात व्यवहार आहेत, तरी कोणाचे. याचा शोध घ्यावा लागणार आहे.
पुण्याला निघालेल्या जोशी कुटुंबीयांवर काळाचा घाला; बोरगावनजीक मोटार अपघातात एकाचा मृत्यू
बॅंकेच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतची नक्कीच माहिती आहे. मात्र, ते बोलत नाहीत. ठेवींसह वेगवेगळ्या खात्यांबाबत रिझर्व्ह बॅंकेसह सहकार खात्यालाही बॅंकेने काहीही माहिती कळवलेली नाही. रिझर्व्ह बॅंकेने ठेवींसाठी "केवायसी'चा नियम केला. मात्र, कराड जनता बॅंकेने त्या नियमालाच हरताळ फासला आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी होण्याची गरज आहे. त्या सहापैकी एकाही ठेवीदारांची केवायसी बॅंकेने घेतलेली नाही. त्यांची कळवलेली माहिती अपूर्णच आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या "केवायसी'च्या नियमालाही हरताळ फासून कोट्यवधींच्या अपहारासाठी नवा फंडा बॅंकेत वापराल गेला, त्याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. (क्रमशः)
लेखापरीक्षणात होणार का चौकशी
कराड जनता सहकारी बॅंकेने विनातारण केलेले कर्ज वाटप, त्याची वसुली, दाखवलेला तोटा, प्रत्यक्ष स्थिती, मोठ्या प्रमाणात काढलेल्या ठेवी, त्याच्या केवायसी याबाबतची तपासणी विशेष लेखापरीक्षणाद्वारे होणार आहे. त्यामुळे त्या तपासणीत या सहा ठेवीदारांबाबत योग्य तपास होण्याची शक्यात आहे. त्यासाठी बॅंकेने दाखल केलेल्या आर्थिक पत्रकांची चौकशी त्या लेखीपरीक्षणात तपासण्याची गरज आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.