NCP-BJP esakal
सातारा

राष्ट्रवादी-भाजप नेत्यांत जागा वाटपावरून खलबत्तं

मकरंद पाटलांचाही एका जागेचा आग्रह; चर्चेची पहिली फेरी पूर्ण, जागा वाटपाचा तिढा सुटेना

उमेश बांबरे

खासदार उदयनराजेंच्या कोट्यातून महिला राखीवमधून इच्छुक असलेल्या गीतांजली कदम यांनीही रामराजेंची भेट घेतलीय.

सातारा : जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची जागा वाटपावरून बैठकीची पहिली फेरी झाली. यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी प्रत्येकी चार जागांवर आपला हक्क सांगितला. आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनीही एक जागा मागितली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या सात नोव्हेंबरपर्यंत यावर तोडगा काढून सर्वसमावेशक पॅनेलची यादी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) अंतिम करणार आहेत.

बारामतीतील कालच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नेतेमंडळींची जागा वाटपाची पहिली बैठक जिल्हा बॅंकेत झाली. या वेळी रामराजे निंबाळकर, सहकारमंत्री पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, संचालक नितीन पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येकाने आपल्याला किती जागा हव्यात. याची माहिती सांगितली. सहकारमंत्री पाटील यांनी बॅंका व पतसंस्था मतदारसंघ, महिला राखीव, गृहनिर्माण आणि दुग्ध उत्पादक संस्था, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघांची मागणी केली. शिवेंद्रसिंहराजेंनीही बॅंका व पतसंस्था मतदारसंघ, महिला राखीव, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग हे मतदारसंघ मागितले आहेत.

त्यापैकी कोणत्याही चार जागा मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे या दोघांकडून चार मतदारसंघांवर दावा सांगण्यात आला आहे. खरेदी- विक्री मतदारसंघातून बिनविरोध झालेले मकरंद पाटील यांनी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या जागेची मागणी केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी आगामी सात नोव्हेंबरपर्यंत चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत. त्यातून मार्ग काढला जाणार आहे. दरम्यान, खासदार उदयनराजेंच्या कोट्यातून महिला राखीवमधून इच्छुक असलेल्या गीतांजली कदम यांनीही रामराजेंची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही.

मतांचा घेतला आढावा

सर्वसमावेशक पॅनेलला किती मते मिळतील, कुठे मते कमी पडतील या विषयावरही चर्चा झाली. यामध्ये खटाव, कोरेगाव, जावळी मतदारसंघांतील मतांबाबतही चर्चा झाली. सर्व बाबतीत चर्चा करून निर्णय केले जाणार आहेत. त्यासाठी आगामी चार दिवसांत चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार असल्याचे राष्ट्रवादीतील संपर्क सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT