Rain esakal
सातारा

पीक नुकसानीची भरपाई द्या; 'बळीराजा'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगडे, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगडे, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारतर्फे मदत जाहीर करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केली आहे.

कोरोना काळात प्रशासन महामारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, कोरोनाचे संकट काही दूर होताना दिसत नाही. आज सर्वसामान्य जनता, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कधी निसर्गनिर्मित संकटे, तर कधी मानवनिर्मित संकटे यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगड, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यातच कोरोनामुळे शेतीमालाला, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना, फळांना मागणी नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जे विकतेय तेही पावसात वाया जात आहे. त्यामुळे निसर्गनिर्मित संकटामुळे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. रात्रं-दिवस शेतामध्ये काबाडकष्ट करून शेतकरी जमिनीत सोनं पिकवतो. मात्र, अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या अस्मानी संकट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे, पडलेल्या घरांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT