सातारा

कृषी विधेयक मागे न घेतल्यास आंदोलन; बळिराजा शेतकरी संघटनेचा इशारा

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : लोकसभेत मंजूर झालेल्या नवीन कृषी विधेयकावर आक्षेप नोंदवत शुक्रवारी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने येथील कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक आंदोलन केले. तातडीने हा कायदा मागे न घेतल्यास संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला. 

संघटनेच्या वतीने आयोजित आंदोलनात श्री. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सुनील कोळी, दीपक पाटील व शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी पंजाबराव पाटील म्हणाले, "मागील आठवड्यात केंद्र सरकारने सत्तेच्या जोरावर हुकूमशाही पध्दतीने शेतकरीविरोधी कायदे पास केले. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांचा विश्वास सरकारवर राहिलेला नाही. 

केंद्राने तीन कायदे केल्यामुळे शेतकरी, शेतीवर आधारित उद्योग, व्यवस्था उद्‌ध्वस्त होणार आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. शेतकऱ्यांची मालकी शेतावर राहणार नाही. भाडवलदारांच्या ताब्यात शेती जाऊन शेतकऱ्यांना गुलामगिरी करावी लागणार आहे. शेतीवर आधारित कामगारांनाही त्याची झळ बसणार आहे. त्याविरोधात सावध होऊन शेतकऱ्यांनी विरोध केला पाहिजे. येणाऱ्या काळात राज्यात आंदोलन उभे करू, असा इशाराही पाटील यांनी दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Latest Marathi News Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर ५ ते ६ किमी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT