Prithviraj Chavan esakal
सातारा

निवडणुकीसाठी उदयनराजेंची कऱ्हाडात जोरदार 'फिल्‍डिंग'

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या.

कऱ्हाड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election 2021) निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी काल कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. कऱ्हाड सोसायटी गटातील उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar), तर आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan), डॉ. सुरेश भोसले यांच्याशी चर्चा केली. खासदार भोसले यांनी भेटीदरम्यान जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने चाचपणीही केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय गाठीभेटींना जिल्ह्यात जोर आला आहे. खासदार भोसले यांनी आज फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भेटीनंतर सायंकाळी कऱ्हाडला भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी आमदार चव्हाण यांची पहिल्यांदा भेट घेतली. त्यानंतर अॅड. उंडाळकर यांच्याशी सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा केली.

त्यानंतर कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, दयानंद पाटील यांची भेट घेतली. कऱ्हाडला त्यांनी केलेला दौरा व गाठीभेटी चर्चेचा विषय ठरल्या. जिल्हा बँकेत अर्ज माघारीची मुदत दोनच दिवसांवर आली आहे. जिल्हा बँकेच्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अर्ज माघारीसाठी दोनच दिवस उरल्याने अनेक राजकीय उलाढाली सुरू आहेत.

मतदारांनी सांगू दे, अर्ज मागे घेतो

कोण कुठं जातंय, हे मला माहिती नाही. मी सर्व मतदारांना जाऊन भेटतो आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांना भेटून होईल. मतदारांनी जर मला जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून तुम्ही अर्ज मागे घ्या, असे सांगितले तर मी अर्ज मागे घेईन. पण, कोण सांगतंय म्हणून मी कधीच अर्ज मागे घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.

बंधूंना कळेना मी त्यांच्यासोबत आहे

सातारा जिल्हा बॅंकेसंदर्भात तुमची तुमच्या बंधूंबरोबर चर्चा झाली आहे का? या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांनी तेच तर वांदे आहे. गेले कित्येक वर्षे मी त्यांना सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण, त्यांना कळत नाही. त्याला काय करायचे आता? असे मिस्कीलपणे सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नाव न घेता टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Heart Transplant: विमानसेवेमुळे सोलापूरचे ‘हृदय’ आता ३० मिनिटांत पुण्यात; हृदयाचे ग्रीन कॉरिडॉर शक्य, अवयवदान चळवळीला मिळणार नवा आयाम

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटचा फायदा होणार नाही, संजय लाखे पाटील; जरांगेंचे आंदोलन चुकीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT