Udayanraje Bhosale esakal
सातारा

तसं झालं तर ठिक, अन्यथा राष्ट्रवादीविरोधात उदयनराजे निवडणूक लढवणार

उमेश बांबरे

सर्वांनी मदत केली, तरच उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सर्वसमावेशक पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना सामावून घेण्याबाबत अद्यापपर्यंत तरी निर्णय झालेला नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले तर ठिक अन्यथा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आज (रविवारी) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीत कोणाकोणाला अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार आणि जागा वाटपाचा तिढा कसा सोडविणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यास तीन दिवस बाकी आहेत, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही, तसेच कोणा कोणाला अर्ज मागे घेण्यास सांगायचे हेही निश्चित झालेले नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष आज (रविवारी) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे लागले आहे. उदयनराजेंना सामावून घेण्याबाबतचा चेंडू अखेरच्या क्षणापर्यंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सोपवून राष्ट्रवादीचे नेते गंमत पाहात बसले आहेत. खासदार उदयनराजे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तेथे सर्वाधिक मते सातारा, कऱ्हाड व फलटण तालुक्यांत आहेत. येथील मतांवर प्रामुख्याने सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूने या मतदारसंघातील ५५ मते उदयनराजेंकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वांनी मदत केली, तरच उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील काल (शुक्रवारी) बारामतीस जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटून आलेले आहेत. या भेटीत त्यांना काही कानमंत्रही या निवडणुकीसाठी मिळालेला असणार आहे. मुळात उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीने तीन ते चार उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत. त्यापैकी कोणाचा अर्ज ठेवायचा हे निश्चित झालेले नाही, तसेच उदयनराजेंशीही आमदार शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा झालेली नाही. त्यामुळे सन्मानाने उदयनराजेंना सामावून घेतले तर ठिक अन्यथा निवडणूक लढायची, अशा तयारीत उदयनराजे व त्यांचे समर्थक सल्लागार आहेत. उदयनराजेंचा जिल्हा बॅंकेत संचालक असूनही कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांना सामावून घेण्याचाही निर्णय होऊ शकतो. याबाबत सभापती रामराजे नार्इक- निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे हे तिघे उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेणार यावर सर्व चित्र अवलंबून आहे.

विजयासाठी १३६ मतांची गरज

उदयनराजे ज्या मतदारसंघातून लढत आहेत. त्यामध्ये एकूण २७२ मतदार आहेत. यातील सर्वाधिक मतदार सातारा तालुक्यात ९८, कऱ्हाड ६६, फलटण १३, पाटण ४०, वाई १५ मते आहेत. उदयनराजेंना निवडून येण्यासाठी १३६ मते मिळाली तर ते निवडून येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT