सातारा

शाहूनगरीत हर्षोल्हासात बाप्पांचं आगमन 

Balkrishna Madhale

सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आज शनिवारी सातारसह राज्यभरात मंगलमय वातावरणात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झालीये. आता पुढील दहा दिवस राज्याच्या कानाकोप-यात मोरया.. मोरयाचा जयघोष असेल.

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी सातारची बाजारपेठ गणेशमूर्ती व सजावटींच्या साहित्यांनी भरली आहे. दरम्यान, कोरोनामुळे शहरातील सुमारे साडेतीनशे गणेशोत्सव मंडळांनी अनोख्या उत्साहात साधेपणाने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली. शहरातील मानाचा गणपती असलेला गुरुवार तालीम, शनिवार पेठेतला श्री शंकर पार्वती गणपती (महादेव), सोमवार पेठेतला आझाद हिंद मंडळ, जय हिंद मंडळ व अजिंक्य मंडळासह अन्य मंडळांनी अतिशय साध्या पध्दतीने मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

बाप्पाच्या आगमन सोहळ्यात कसलीही कमी पडू नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते काळजी घेत होते. दरम्यान, बाप्पाचे पहिल्याच दिवशी दर्शन घेता यावे यासाठी भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. शहरात बाप्पाचे ठिकठिकाणी आगमन झाल्याने नागरिकांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्याही जलमंदिर पॅलेस येथे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यात प्रति वर्षाप्रमाणे पर्यावरण पूरक बाप्पांची प्रतिष्ठापना केली. तसेच सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम व त्यांचे पती डाॅ. संजोग कदम यांनी आपल्या घरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी कुठे ही भाविक व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी शाहूपुरी पोलीस आणि सातारा शहर पोलीस शहरात ठिकठिकाणी खडा पहारा देत होते. 

मागील वर्षी महापूर आणि यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या असले तरी, भाविकांचा उत्साह दांडगा आहे. शहरातील मिठाई दुकानदारही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरपोहोच मिठाई व मोदकाची सेवा दिली. दुपारनंतर बाॅम्बे रेस्टाॅरंट येथे ग्रामीण भागातील नागरिक गणपती घेण्यासाठी येत होते. गडकर आळी, कुंभारवाडा येथून मंडळांचे कार्यकर्ते बाप्पांच्या जयघोषात गणेश मूर्तीसह मार्गस्त होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Cervical Cancer Early Detection: महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार; कामा रुग्णालयातील तज्ज्ञांच्या अभ्यासातून उघड

IPL 2026 Updates: हार्दिकनंतर Mumbai Indians एका जुन्या सहकाऱ्याला परत आणणार; रोहितच्या जागेसाठी सुरू झालाय बॅक अप प्लान

Google Gemini Bhaubeej image Prompt: गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्सने बनवा भावा-बहिणीचे खास AI फोटो

Latest Marathi News Live Update : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT