सातारा

कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला गती द्या! निवेदन सादर

राजेश पाटील

श्री.पाटील यांनी दिल्ली येथे मंत्री दानवे यांची भेट घेवून याप्रश्नी चर्चा केली आणि निवेदनही सादर केले.

ढेबेवाडी (सातारा): 'विकासाला मोठी चालना देणाऱ्या कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने प्रारंभ करावा' अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य भरत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्यक्ष भेटून केली. श्री.पाटील यांनी दिल्ली येथे मंत्री दानवे यांची भेट घेवून याप्रश्नी चर्चा केली आणि निवेदनही सादर केले.

सकाळशी बोलताना ते म्हणाले, 'विशेषतः कऱ्हाड व पाटण तालुक्याच्या विकासाला मोठी चालना देणारा हा रेल्वे मार्ग तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. कोकण रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वे यांना जोडणारा हा जवळचा मार्ग ठरणार असून तो पूर्ण झाल्यावर कऱ्हाड हे मोठे रेल्वे जंक्शन होईल. कऱ्हाडचे शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय तसेच साखर कारखानदारी क्षेत्र झपाट्याने विस्तारत आणि विकसित होत असताना कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्ग त्यास खूप मोठ्या उंचीवर पोहचविण्यास मदत करेल.

कृषी, औद्योगिक विकासापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या पाटण तालुक्याच्या विकासालाही त्याव्दारे गती मिळेल. विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासही चांगला हातभार लागेल. कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गावर नऊ स्थानके असणार आहेत. मार्गाचे ई टेंडरिंगही झालेले असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने याप्रश्नी आम्ही रेल्वे मंत्र्यांशी विस्तृत चर्चा केली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची विनंती केली. त्यावर लवकरच त्यासंदर्भात कार्यवाही करून विकासाचा नवा मार्ग प्रत्यक्षात आणण्याची ग्वाही मंत्री दानवे यांनी दिल्याचे भरत पाटील यांनी सांगितले.

''कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्ग प्रत्यक्षात आल्यानंतर विकासाला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे विलंब न लावता ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाचा हा मार्ग खुला होण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे''.

- भरत पाटील, (प्रदेश कार्यकारी सदस्य भाजप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT