सातारा

बहुजनांनो! आरक्षण टिकवण्यास एकत्र या : बापूसाहेब भुजबळ

अशपाक पटेल

शिरवळ (जि.सातारा) ः संविधानाने दिलेली आरक्षणे अबाधित ठेऊनच इतर समाजातील आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला, तरच सामाजिक समतोल राखला जाईल. बहुजनांनी आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र यावे. नऊ डिसेंबरच्या मोर्चास सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी केले.
 
शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे बहुजन हक्क समिती व इतर समाज संघटनांनी आयोजिलेल्या बहुजन आरक्षण बचाव संवाद बैठकीत ते बोलत होते. या वेळी सर्व राजकीय पक्षातील बहुजन समाजातील नेते व्यासपीठावर एकत्र आले होते.
पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते 

श्री. भुजबळ म्हणाले, ""संविधानाने बहुजनांना दिलेले आरक्षण आजही कायद्याने कायम आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील आरक्षणासाठी अनेक घटकांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपले आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बहुजन समाजातील सर्व अठरापगड जातीतील लोकांचे हक्क अबाधित राहावेत व त्यांच्या सवलती कायम राहाव्यात, यासाठी 9 डिसेंबरच्या मोर्चाच्या नियोजन खंडाळा तालुक्‍यात अतिशय कौशल्य पूर्ण केले आहे.''
 
याप्रसंगी राजेंद्र नेवसे, रामदास काबंळे, प्रदीप माने, संदीप नेवसे, नामदेव लोहार व प्रदीप क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. दरम्यान, खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीमार्फत 9 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पारगाव-खंडाळा एसटी स्टॅंड ते खंडाळा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

विनोबांच्या आचार्य कुलातील सज्जन शक्तीची देशाला गरज

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT