NCP vs BJP-Shiv esakal
सातारा

भाजप-शिवसेना युती राष्ट्रवादीला धक्का देणार? नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

रुपेश कदम

सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी, तर सत्तांतर करण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरसावली आहे.

दहिवडी (सातारा) : कित्येक ग्रामपंचायतींपेक्षा जास्त म्हणजेच दोन हजार ८५८ मतदान असलेल्या दहिवडी विकास सेवा सोसायटीचा (Dahiwadi Vikas Seva Society) प्रचार शिगेला पोचला आहे. वर्षानुवर्षांची सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) , तर सत्तांतर करण्यासाठी भाजप (BJP)-शिवसेना युती सरसावली आहे.

या सोसायटीवर (Dahiwadi Society Election) राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादीने शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखाली लढवून जिंकली होती. मात्र, त्यानंतर शेखर गोरे हे शिवसेनेत (Shiv Sena) गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सोसायटीवर शिवसेनेची सत्ता आली होती. यावेळी राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) गट व शेखर गोरे गट एकत्र आले आहेत. प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावंत, रामभाऊ पोळ, दादासाहेब जाधव, सुनील पोळ, तानाजी जाधव, बाळासाहेब गुंडगे, सुरेश इंगळे व राष्ट्रवादीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या नेतृत्वाखालील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी शेतकरी विकास पॅनेल निवडणुकीला सामोरे जात आहे.

आमदार जयकुमार गोरे व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल जाधव, धनाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, सिध्दार्थ गुंडगे, राजेंद्र जाधव, राजेंद्र खांडे, रवींद्र जाधव व भाजप आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नेतृत्वाखालील श्री सिध्दनाथ ग्रामविकास पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. अपक्षही आपले नशीब अजमावत आहे. दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार करण्यात येत असून प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. जाहिरातीचे फ्लेक्स, पत्रिका व वाहनांवरील ध्वनीयंत्रणेच्या साह्याने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रविवारी (ता.२४) मतदान होणार असून उर्वरित दिवसांमध्ये साम, दाम, दंड, भेद याचा पुरेपूर वापर केला जाण्याची शक्यता आहे.

क्रॉस मतदानाचा फटका

माणमध्ये आतापर्यंत झालेल्या सोसायटी निवडणुकांपैकी बहुतांशी निवडणुकांमध्ये क्रॉस मतदानमुळे सत्ता येण्याचा व जाण्याचा प्रकार घडला आहे. दहिवडी सोसायटीतही क्रॉस मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत दोन्ही पॅनेल काय उपाययोजना करणार, यावर निकाल अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT