Ranjit Singh Nimbalkar esakal
सातारा

भाजप आमदार गोरेंविषयी बोलण्याची माझी लायकी नाही, ते महान आहेत; असं का म्हणाले NCP नेते रामराजे?

आमचे जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांच्याशीही वैयक्तिक जमलेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीत दोन गट असून, आगामी काळात काका- पुतणे यांनी एकत्र यावेत व वाद संपवावा, असे मत कार्यकर्त्यांत आहे.

सातारा : महायुतीच्या (Mahayuti) जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघाची मागणी अजित पवारांनी केली आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. माढा मतदारसंघातून (Madha Constituency) मी माझ्या भावासाठी तिकीट मागतोय. ते मिळाले तर विद्यमान खासदारांना ते मिळणार नाही, असे माझे म्हणणे होते. त्यासाठी आमचा कोणावरही दबाव नाही; पण दोन्ही मतदारसंघांतून उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय दिल्लीतूनच होणार आहे, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) दौऱ्याने आमदार गोरेंचा माण, खटाव मतदारसंघात दबदबा वाढतोय, असे वाटतेय का, यावर त्यांनी हे आता मोदींनाच विचारा, असा टोला मारला. स्वराज्य सप्ताहाची माहिती व पदाधिकारी निवडीच्या बैठकीनंतर रामराजेंनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

फलटणमधील तुमच्या वादाचा महायुतीच्या राजकारणावर परिणाम होणार का, यावर ते म्हणाले, ‘‘फलटणमध्ये खासदारांच्या वडिलांपासून आमचे राजकीय वैर आहे. आमचे जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांच्याशीही वैयक्तिक जमलेले नाही. जो तो त्याच्या पद्धतीने राज्य करत असतो. माझ्यावर कोणी बोलले तर मी बोलणारच.’’

राष्ट्रवादीत दोन गट असून, आगामी काळात काका- पुतणे यांनी एकत्र यावेत व वाद संपवावा, असे मत कार्यकर्त्यांत आहे. त्यासाठी भविष्यात तुम्ही पुढाकार घेऊ शकता का, या प्रश्नावर रामराजे म्हणाले, ‘‘अशा कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. हा त्यांच्या घरातील अंतर्गत वाद असून, तो कधी मिटेल ते कोणालाही सांगता येणार नाही. आमच्यासारख्याला पक्षातील ही फूट पचवायला अवघड गेले.

शेवटी राजकारणात जेवढा नेता महत्त्वाचा तेवढाच कार्यकर्ताही असतो. त्यांच्याच बळावरच नेत्याचे काम चालते. आम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागेल, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे. इतर घराण्यांसह छत्रपतींचे घराणे आहे. त्यांच्यातही वाद होऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. वाद होणे कोणालाही परवडणारे नाहीत.’’

जिहे- कठापूर योजनेचे श्रेय कोणाचे, यावर रामराजे म्हणाले, ‘‘लोकशाहीत कोण काम करतेय आणि श्रेय कोणाला मिळतेय. एका सरकारच्या काळात पायाभरणी होते. दुसरे सरकार भूमिपूजन करते आणि आता तिसऱ्या सरकारच्या काळात जलपूजन होत आहे; पण या योजनेचा पाया जुना असून, कृष्णा खोरे विकास महामंडळ झाले नसते तर जिल्ह्याला शंभर ते १२० टीएमसी पाणी मिळाले नसते. त्यामुळे आमदार गोरेंनी श्रेय घ्यावे. कारण ते पाणीदार आमदार आहेत. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. ते फार थोर आहेत. त्यांच्याविषयी बोलण्याची माझी लायकी नाही. ते महान आहेत. त्यांच्याविषयी न बोलले बरे.’’

माढा व सातारा लोकसभेच्या जागेबाबत ते म्हणाले, ‘‘सातारा लोकसभा मतदारसंघाची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. माढा मतदारसंघातून मी माझ्या भावासाठी तिकीट मागतोय. ते मिळाले तर विद्यमान खासदारांना ते मिळणार नाही, असे माझे म्हणणे होते. त्यासाठी आमचा कोणावरही दबाव नाही; पण उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय दिल्लीतूनच होणार आहे.’’ सध्या पोलिस ठाण्यात गोळीबाराचे प्रकार वाढले असून, कायदा व सुव्यवस्था बिघडलीय असे वाटते का, यावर ते म्हणाले, ‘‘हा वैयक्तिक वादातून झालेला आहे. आमदारांचा गोळीबार मान्य होणारा नाही. त्यांच्यामागची कारणे तपासात निघतील; पण झालेला प्रकार योग्य वाटत नाही.’’

निमंत्रण आले तर जाणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माण व सातारा दौऱ्यात आपण सहभागी होणार का, या प्रश्नावर रामराजे म्हणाले, ‘‘अशा कार्यक्रमांचे निमंत्रण पंतप्रधान कार्यालयाकडून येत असते. त्यांच्याकडून बोलावणे झाले तर आम्ही जाण्याबाबत निर्णय घेऊ.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT