सातारा

पक्ष्यांच्या किलबिलाटासाठी इस्लामपूरच्या शिक्षकाची धडपड

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेरे येथील सद्‌गुरू आश्रमशाळेचे शिक्षक आष्पाक आत्तार यांनी आपल्या इस्लामपूर येथील घराजवळ पक्ष्यांसाठी घरटी तयार करून पक्ष्यांचे संगोपन केले आहे. यामुळे त्यांच्या अंगणात चिमणी, कबूतर, लाल बुडाचा पक्षी, कोकीळ अशा अनेक जातींचे पक्षी वावरताना दिसत आहेत. 

वारणावती येथील घराजवळही अनेक पक्षी विहार करत आहेत. श्री. आत्तार यांचे पक्ष्यावरील प्रेम पाहून त्यांच्या अंगणात मोरही दररोज हजेरी लावत आहे. त्याच्यासाठी अंगणात ठेवलेल धान्य तो मोठ्या डौलाने खात आहे. त्याच्या केकारवने परिसर दुमदुमून जात आहे. श्री. आत्तार यांनी पक्ष्यांसाठी केवळ घरटी केली नाहीत, तर त्या घरट्यांवर शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

या उपक्रमाबाबत श्री. आत्तार म्हणाले, "पक्ष्यांसाठी वाटीभर पाणी मूठभर धान्य अंगणात ठेऊन, तसेच घरटी बनवून पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, असा शुभ संदेश देण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल. पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT