Udayanraje Bhosale vs Shivendrasinghraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendrasinghraje Bhosale esakal
सातारा

सगळीकडं मीच त्यांना दिसतो, माझ्‍याच नावानं ते गरळ ओकतात : उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

'त्‍यांच्‍या' आरोपाला आपण आणि जनता काडीचीही किंमत देत नाही.'

सातारा : साताऱ्याची एमआयडीसी (Satara MIDC) स्थापन झाली. त्यावेळी आम्ही तिसरीमध्ये होतो आणि ‘त्यांचा’ तर जन्मदेखील झाला नव्हता. तत्कालीन लोकप्रतिनिधी, त्यानंतरचे लोकप्रतिनिधी व ज्यांचा ‘बालकमंत्री’ म्हणून उल्लेख केला गेला होता, या सर्वांच्या कचखाऊ वृत्तीमुळे डॉ. बेग, इंडियन सिमलेस पाईप्स, एल ॲन्ड टीसारख्या कंपन्या रातोरात दुसरीकडे गेल्या. या कारणांमुळे एमआयडीसीची खरी वाट लागली हे त्यांनाही माहीती आहे. परंतु, त्यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र मीच दिसतो आणि नेहमीप्रमाणे ते माझ्‍या नावाने गरळ ओकत असल्‍याची टीका नाव न घेता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्‍यावर केली आहे.

सातारा परिसरातील एका कार्यक्रमादरम्‍यान सातारा एमआयडीसीसीची वाट लागण्‍याचे कारण दिव्‍य खासदार असल्‍याची टिका आज केली होती. या टिकेला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात उदयनराजे यांनी म्‍हटले आहे कि, साताऱ्याबरोबरच सुरु झालेली नगरची एमआयडीसी आज प्रचंड विकसित झाली आहे.

याबाबतची वस्तुस्थिती संबंधितांनी समजून घेवून वक्तव्य करणे आवश्‍‍यक असून साप समजून भुई थोपटण्याची सवय त्‍यांनी सोडणे आवश्‍‍यक आहे. पडद्याआडून गुन्हे करणाऱ्या पांढऱ्या वेशातील गुन्‍हेगारांनी दुसऱ्यांवर आरोप करणे, त्‍यांना शोभून दिसत नसून त्‍यांच्‍या आरोपाला आपण आणि जनता काडीचीही किंमत देत नाही. पंडीत ॲटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणारच आहे. त्यात सर्व काही बाहेर येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT