BJP MLA Shivendraraje Bhosale Pusesawali Riots esakal
सातारा

Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलीनंतर शिवेंद्रराजेंनी सातारकरांना केलं 'हे' आवाहन; म्हणाले, कठीण प्रसंगात डगमगून..

पुसेसावळीच्या (Pusesawali Riots) घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ डिजिटल टीम

सद्यःस्थितीत जिल्ह्यात अतिशय अशोभनीय व निंदनीय घटना घडली आहे.

सातारा : सातारकरांसाठी सध्या कसोटीचा काळ असून, या कठीण प्रसंगात डगमगून न जाता सामाजिक सलोखा व ऐक्याची भूमिका घेऊन आपण शांतीच्या मार्गाने वाटचाल करूया. समाज माध्यमांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित न करता सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण न करत जातीय सलोखा व ऐक्य अबाधित ठेवावे, असे आवाहन भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले.

पुसेसावळीच्या (Pusesawali Riots) घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांना प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले, की सातारा ही शूरांची, वीरांची तसेच शांत व संयमी लोकांची भूमी आहे. जिल्ह्याला एक वैभवशाली सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे. कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार आजवर जिल्ह्यात यापूर्वी घडलेले नाहीत.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात अतिशय अशोभनीय व निंदनीय घटना घडली आहे; परंतु या सर्वातून पुढे जाताना आपण सर्वांनी शांती, सलोखा व सहिष्णुता अबाधित ठेवायची आहे. समाजात शांतता प्रस्थापित करण्याचा व असुरक्षित वातावरण निवळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. सातारकरांच्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा काळ आहे.

या कठीण प्रसंगात डगमगून न जाता सामाजिक सलोखा व ऐक्याची भूमिका घेऊन आपण शांतीच्या मार्गाने वाटचाल करत राहूया. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाज माध्यमात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित न करता, तसेच धार्मिक तेढ निर्माण न करता जातीय सलोखा ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT