Jayakumar Gore Marathi News
Jayakumar Gore Marathi News esakal
सातारा

पक्षानं आखली रणनीती, साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार; 'या' आमदारानं व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

'सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला, तरी जिल्ह्यात त्यांचे तीनच आमदार उरले आहेत.'

सातारा : सातारा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असला, तरी जिल्ह्यात त्यांचे तीनच आमदार उरले आहेत. आता परिस्थिती बदलली असून, राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होत नाहीत, असं नाही तर त्यांना निश्चितपणे हरवलं जाऊ शकतं. त्यासाठी भाजपनं (BJP) रणनीती आखली असून, आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी देशातील १४४ मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री सोमप्रकाश येत्या रविवार (ता. २८) ते ३० आॅगस्ट असे तीन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक पातळीवर चर्चा, जाहीर मेळावे आणि रॅलीच्या माध्यमातून पक्षाची ताकद दाखवणार आहेत, अशी माहितीही आमदार गोरेंनी दिली.

आमदार पुढं गोरे म्हणाले, देशातील १४४ मतदारसंघांत भाजपचा खासदार निवडून आणण्यासासाठी भाजपच्या केंद्रीय समितीनं कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा (Satara Lok Sabha Constituency) समावेश आहे. या निमित्ताने जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय वाणिज्यमंत्री सोमप्रकाश यांच्यावर आहे. त्यांचे २९ ऑगस्टला सकाळी दहा वाजता शिरवळ इथं आगमन होईल. त्यानंतर वाई इथं महागणपती मंदिरात आरतीला उपस्थित राहतील. पाचवड येथे सरपंच नितीन विसापुरे यांच्या घरी भेट, लिंब येथे कार्यकर्त्यांशी चर्चा, साताऱ्यात फर्न हॉटेल येथे कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात केंद्र शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधतील. त्यानंतर दैवज्ञ मंगल कार्यालयात सायंकाळी सात ते आठ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतील. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार व जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांशी संवाद साधतील. त्यानंतर कोरेगाव, रहिमतपूरचा दौरा, तसेच उंब्रज आरोग्य केंद्राला भेट देऊन युवा कार्यकर्त्यांना संबोधित करतील.’’

दरम्यान, 30 ऑगस्टला हुतात्मा स्मारक मलकापूर ते यशवंतराव चव्हाण निवासस्थान अशी कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली निघणार आहे. तेथून वेणूताई चव्हाण हॉल येथे कऱ्हाड तालुक्यातील उद्योगपती, व्यापारी तसेच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी मंत्री सोमप्रकाश घेतील. महिला मोर्चा आघाडीच्या प्रतिनिधींची बैठक दुपारी बारा वाजता विश्वनाथ मल्टिपर्पज हॉल वाठार येथे होईल. हा कार्यक्रम सुरभी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला आहे. दुपारी दोन ते तीन कोयना वसाहत कऱ्हाड येथे, तसेच मलकापूर येथील गेस्ट हाऊसवर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन संघटनात्मक बांधणीची रणनीती आणि पुढील दिशा ठरवली जाणार आहे. जिल्ह्याचा अहवाल घेऊन केंद्रीय कार्यकारिणी समितीला सादर करणार आहेत, असे श्री. गोरे यांनी सांगितले. या वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मदन भोसले, अतुल भोसले, प्रदेश कार्यकारिणीचे विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, महिला आघाडीच्या सुरभी भोसले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT