सातारा

Accident News: २० ते २५ प्रवाशी असलेल्या बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात; घटनेत एका महिलेचा मृत्यू

२० ते २५ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून अपघातांच सत्र सुरूच आहे. साताऱ्यातून अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस पसरणी घाटात अवघड वळणावर असताना अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे बस घाटात मागच्या दिशेला गेली. यावेळी पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या अंगावर आली. त्यामुळे दुचाकीवरील एका महिलेसह अन्य २ जण बसखाली आले. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान बस चालकाने बस नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने बसखाली दुचाकी आल्यामुळे प्रिती बोधे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच ब्रेक फेल झालेली बस कठड्यात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या बसमध्ये 20 ते 25 जण प्रवास करत होते अशी माहिती आहे. पोलिसांकडून पंचनामा झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Kirit Somaiya : सोमय्या बॅक इन ॲक्शन! मंत्री मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दिलं खळबळजनक उत्तर

Lasalgaon News : कांदा प्रश्नी विधिमंडळ गाजणार! छगन भुजबळ आणि भास्कर भगरे मैदानात; तोडगा निघणार का?

Gadchiroli : भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू, महिन्याभरापूर्वी उधळलेला विजयी गुलाल

Latest Marathi News Live Update : चेंबूरमध्ये धक्कादायक घटना, इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात फुल्ल AC चालवूनही वीजबिल होईल 30% कमी; आजपासूनच फॉलो करा 'या' स्मार्ट टिप्स

SCROLL FOR NEXT