Yavateshwar Ghat Accident esakal
सातारा

Yavateshwar Ghat : खासदार उदयनराजेंची 'ती' भावूक पोस्ट अन् यवतेश्‍‍वर घाटातील भीषण अपघाताबाबत महत्वाची अपडेट समोर

समोरासमोर झालेल्‍या दोन चारचाकींच्‍या अपघातात गायत्री आहेररावचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

या जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा : यवतेश्‍‍वर (ता. सातारा) येथील घाट परिसरात (Yavateshwar Ghat Accident) काल रात्री समोरासमोर झालेल्‍या दोन चारचाकींच्‍या अपघातात गायत्री दीपक आहेरराव (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) हिचा मृत्यू झाला होता. याच अपघातात इतर तीन जण जखमी झाले आहेत.

या अपघातप्रकरणी गायत्री आहेरराव (Gayatri Aherrao) प्रवास करीत असलेल्‍या चारचाकीस समोरून धडक देणाऱ्या कारचालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात (Satara Police Station) गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. शनिवार पेठेत राहणारी गायत्री दीपक आहेरराव ही सातारा नगरपालिकेत कार्यरत होती.

काल रात्री ती ओंकार हणमंत लोखंडे (रा. ११७, शुक्रवार पेठ, सातारा) याच्‍यासह कास बाजूकडून साताऱ्याकडे चारचाकीतून येत होती. त्‍यांच्‍या चारचाकीस यवतेश्‍‍वरजवळ समोरून येणाऱ्या (एमएच ११ सीक्‍यू ६४९४) चारचाकीने गायत्री आहेरराव असणाऱ्या चारचाकीस जोराची धडक दिली.

यात गंभीर जखमी झाल्‍याने गायत्री हिचा मृत्‍यू झाला. या अपघातात तिच्‍यासोबत असणारा ओंकार लोखंडे, तसेच धडक देणाऱ्या चारचाकीतील रोहन राजाराम शेलार (रा. तापोळा), सिद्धांत संजय किर्दत (रा. ३७१, करंजे पेठ, सातारा) हे जखमी झाले. या जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची तक्रार विक्रांत बाळासाहेब आहेरराव (रा. माची पेठ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवली आहे. यानुसार (एमएच ११ बीव्ही ५५६८) या चारचाकीच्‍या चालकावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, तपास उपनिरीक्षक दळवी आणि अपघात विभागाचे हवालदार पांडव हे करीत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी या अपघाताबाबत फेसबुक पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT