सातारा

आंदोलन भोवले! पश्चिम महाराष्ट्रातील तेवीस कलाकारांवर गुन्हा

Balkrishna Madhale

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हाभर जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणा-या तेवीस जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे आणि सहका-यांनी केली.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून तो रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, कोरोना कालावधीत अनेक घटकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही संघटनांकडून आंदोलन, निदर्शने, मोर्चा काढण्यात येत आहेत. बुधवारी (ता. १६) कलाकार महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचा भंग झाला असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेत यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कलाकार महासंघाचे संस्थापक अनिल जयपाल मोरे (रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली), जयवंत श्रीपती वायदंडे (वय ४६, रा. नाझवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), रामचंद्र शामराव जाधव (वय ३०, रा. १०३, मल्हापपेठ, सातारा), महेंद्र बाळू यादव (वय २४, रा. यादव दवाखाना पाठीमागे, चाफोली रोड, पाटण), महेश भालचंद्र कदम (वय ३५, रा. २४०४, डी वार्ड, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), बापुराव शामराव जाधव (वय ३५, रा. एसटी स्टॅण्डसमोर, मल्हारपेठ, ता. पाटण), प्रशांत राजाराम साठे (वय ३५, रा. रेठरे बुद्रुक, ता. क-हाड), उमाजी रंगराव अवघडे (वय ४५, रा. भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), दीपक शंकर जाधव (वय ३१, रा. संजयनगर, शेरे, ता. क-हाड), धर्मेंद्र दिनकर चव्हाण (वय ३०, रा. संजयनगर, शेरे, ता. क-हाड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच संजय उत्तम भिंगारदिवे (वय ४०, रा. १८१, मल्हारपेठ, सातारा), मारुती शामराव कांबळे (वय  ४६, रा. वाघापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), रविराज संजय  जाधव (वय २४, रा. द्वारा बापूराव जाधव, मल्हारपेठ, ता. पाटण), विजय नारायण सावंत (वय ३९, रा. अतित, ता. सातारा), सचिन जयवंत लोहार (वय २१, रा. तारळे, ता. पाटण), सुनील दिनकर कांबळे (वय ३५, रा. मारुल हवेली, ता. पाटण), महेश संजय देटके (वय २३, रा. तारळे, ता. पाटण), सतीश बजरंग वायदंडे (वय ४५, रा. नारळवाडी, ता. पाटण), अरविंद बाळू लादे (वय २८, रा. बोंद्री, ता. पाटण), प्रकाश आप्पा भोळे (वय २६, रा. बोंद्री, ता. पाटण), राहूल बाबासाहेब भोळे (वय २३, रा. बोंद्री, ता. पाटण) आणि शिवाजी वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT