Satara Crime News esakal
सातारा

Satara Crime News: अल्पवयीन मुलीसोबत विवाह करून अत्याचार; पती, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

Satara Crime News: पीडित मुलीच्या वडिलांना पैसे देऊन तिचा बालविवाह लावून दिला.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील (Karnataka Bijapur) भागेवाडी तालुक्यात असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा 29 एप्रिल रोजी शिराळा इथं विवाह लावून देण्यात आला.

Satara Crime News : अल्पवयीन मुलीचा (Minor Girls) विवाह लावून देण्यासह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईनं फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, आठ जणांवर कराड तालुका पोलीस (Karad Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र शंकर शेवाळे, बापूराव आनंदा शेवाळे, संगीता बापूराव शेवाळे (तिघेही रा. येवती-शेवळवाडी, ता. कराड), तातोबा पाटील (रा. शितुर, ता. शिराळा, जि. सांगली), ताई मोरे (रा. इस्लामपूर) यांच्यासह विवाह लावणारा भटजी आणि अन्य दोघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील (Karnataka Bijapur) भागेवाडी तालुक्यात असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा 29 एप्रिल रोजी शिराळा इथं विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर संबंधित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही राजेंद्र शेवाळे यानं त्या मुलीवर अत्याचार केला.

तसेच इतरांनी पीडित मुलीच्या वडिलांना पैसे देऊन तिचा बालविवाह लावून दिला. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT