सातारा : कारला कंटेनर घासल्याच्या कारणावरून पाच युवकांनी कंटेनर चालकासह क्लिनरला मारहाण करून त्यांच्याकडील 19 हजारांची रोकड हिसकावल्याची घटना नुकतीच महामार्गावर वाढे फाटा परिसरात घडली. या घटनेची तातडीने दखल घेत सातारा तालुका पोलिसांनी युवकांना ताब्यात घेतले आहे.
शुभम अनिल रसाळ (रा. पाटखळमाथा, ता. सातारा), यशवर्धन दीपक पवार (रा. गोडोली), अभिषेक लक्ष्मण फडतरे (रा. सदरबझार, सातारा), रोहित राजेंद्र रसाळ (रा. बोरखळ, ता. सातारा), शैलेश काशिनाथ पवार (रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत. त्यामध्ये एका डॉक्टरच्या मुलाचाही समावेश आहे. या सर्वांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाॅक्टरकडून लाखाेंची खंडणी उकळणा-या पुण्यासह साता-यातील महिलेस अटक
वाढे फाटा येथून लोणंदकडे रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास निघालेल्या कंटेनरचा कारला धक्का लागला. त्यावरून या युवकांनी कंटेनरचालक व क्लिनरला अडवून मारहाण केली. कंटेनरची काचही फोडली. त्यानंतर त्यांच्याकडील 19 हजारांची रोकड, दोन मोबाईल व दोन कपड्यांच्या बॅगा असे साहित्य जबरदस्तीने घेऊन हे युवक पळून गेले.
पोलिस तपास सुरु; सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांची लाखाेंची मदत गायब
या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तत्काळ हालचाल करून चार युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, गुन्ह्यातील चारचाकी वाहन, मोटरसायकल हस्तगत केली. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, नितीराज थोरात, सागर निकम यांनी कारवाईत भाग घेतला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.