Power Officer Power Officer
सातारा

विजेच्या तारेवर पाय पडून शेतकऱ्याचा मृत्यू; उंब्रजात वीज अधिकाऱ्यावर गुन्हा

शेतात वाकलेल्या विजेच्या तारांबाबत दादासाहेब चव्हाण यांनी सात वर्षांपूर्वी महावितरण कंपनीकडे तक्रार दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (सातारा) : इंदोली येथील शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू मागील आठवड्यात झाला होता. त्या प्रकरणी वीज कंपनीसह अधिकाऱ्यांवर येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला. इंदोली येथे घटना घडली होती. दादासाहेब शिवाजी चव्हाण (वय 54, रा. इंदोली) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा मंथन याने दिलेल्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोली येथे दोन मार्चला सकाळी दादासाहेब चव्हाण पट्टी नावाच्या शिवारात पाणी पाजत होते. त्यावेळी शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेवर पाय पडून विजेच्या तारेचा शॉक लागून जागीच ठार झाले होते. शेतात वाकलेल्या विजेच्या तारांबाबत तसेच वाकलेल्या पोलबाबत दादासाहेब चव्हाण यांनी सात वर्षांपूर्वी येथील महावितरण कंपनीकडे तक्रार देत होते.

त्यांनी सात वर्षांत वारंवार लेखी तक्रार दिली होती. मात्र, त्याकडे वीज महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तुटलेल्या तारेचा शॉक लागल्याने दादासाहेब चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे मंथन यांनी देलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चव्हाण यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त बोर्‍यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT