सातारा

पार्टीला मतदान केले नाही म्हणून वरखडवाडीत कुटुंबास मारहाण; ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील वरखडवाडीतील (ता. वाई) एका कुटुंबातील सदस्यांनी पार्टीला मतदान न केल्याने घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर वाई पोलिस ठाण्यात मारहाणीचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. वरखडवाडीत तणाव निर्माण झाला होता. मतमोजणी दिवशी सायंकाळी प्रकाश बबन रांजणे हे घरात सायंकाळी टीव्ही पाहात बसले होते. 

त्याच वेळी वैभव बाजीराव साळुंखे, पंकज दामोदर पवार, प्रसाद सर्जेराव साळुंखे, विशाल आनंदराव फणसे यांनी घरात घुसून तू आमच्या पार्टीला का मतदान केले नाही, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत हातातील काठीने मारहाण केली. त्यात अश्विनी रांजणे, कृष्णा महादेव रांजणे, शिवाजी महादेव सपकाळ जखमी झाले. 

या प्रकरणी प्रकाश रांजणे यांनी मारहाण करणाऱ्या चौघांवर तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी (ता. 19) पहाटे पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे अधिक तपास करत आहेत.

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी

मंत्रालयातील निलंबित अव्वल सचिव खाताेय कोठडीची हवा

सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी खर्चात २०% कपात, लाडकी बहीण योजनेवरही परिणाम होणार? जाणून घ्या!

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी आणले गट्टा मतदान; मुश्रीफांचेही शक्तिप्रदर्शन, तालुकानिहाय मतदान जाणून घ्या

VIRAT ROHIT NEXT MATCH: रोहित शर्मा अन् विराट कोहली पुन्हा कधी मैदानात दिसणार? चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Tiger Deaths: चिंताजनक, राज्यात वाघांच्या मृत्यूचा उच्चांक ;मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९४ वाघ ठार

Latest Marathi News Live Update : पंढरपूर-खामगाव पालखी महामार्गावर एसटी बस आणि कारचा अपघात , ५ ठार

SCROLL FOR NEXT