Crime News Sakal
सातारा

Crime News : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ तर मुलीचा विनयभंग करुन धमकी; 10 जणांवर गुन्‍हा दाखल

साताऱ्यात एकीकडं विवाहितेचा छळ तर दुसरीकडं मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा शहर परिसरात पाठलाग करून अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग केल्‍याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : साताऱ्यात एकीकडं विवाहितेचा छळ तर दुसरीकडं मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्‍याप्रकरणी सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात (Satara Police) गुन्‍हा दाखल झाला आहे.

पती सागर, सासरे दुर्योधन यांच्यासह पाच महिलांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सोनाली सागर शिंदे (रा. कोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्‍ट २०१९ ते मे २०२३ या कालावधीत सासरच्या मंडळींनी जाचहाट केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्‍हटले आहे.

मुलीच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा

तर, दुसरीकडं सातारा शहर परिसरात पाठलाग करून अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग केल्‍याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुश्रीत सावंत, फरीद शेख, सूरज पवार अशी त्यांची नावे आहेत. याबाबत संबंधित मुलीने फिर्याद दिली आहे. नोव्‍हेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत संशयितांनी दुचाकीवरून पाठलाग करून 'तू भेटायला का येत नाही,' असे म्‍हणून दमदाटी व विनयभंग केल्याचे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT