Bhalchandra Kadam esakal
सातारा

महाबळेश्वर-पाचगणीतील निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे : भाऊ कदम

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर, पाचगणी (Mahabaleshwar, Panchgani) व परिसरातील निसर्ग अत्यंत विलोभनीय, मनाला भुरळ पाडणारा व जीवनात सकारात्मक ऊर्जा देणारा असून पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) फेम कलाकार भाऊ कदम (Bhalchandra Kadam) यांनी केले. (Chala Hawa Yeu Dya Fame Bhalchandra Kadam Visit To Mahabaleshwar Panchgani Satara Marathi News)

'चला हवा येऊ द्या' फेम प्रसिद्ध कलाकार व रसिक प्रेक्षकांचा आवडता कलाकार भाऊ कदम काही कामानिमित्त या भागात आले होते.

'चला हवा येऊ द्या' फेम प्रसिद्ध कलाकार व रसिक प्रेक्षकांचा आवडता कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam) काही कामानिमित्त या भागात आले होते. ही खबर महाबळेश्वर नाट्यपरिषदेच्या (Mahabaleshwar Natya Parishad) पदाधिकारी, तसेच पत्रकारांना कळल्यावर त्यांनी त्याचा मागोवा घेत त्यांची भेट घेतली. त्यावेळी नाट्य परिषद व पत्रकारांच्या वतीने त्यांचे स्वागत फुलदाणी देवून करण्यात आले. यावेळी परिसरातील पावसाळी निसर्ग सौंदर्य पहिल्यानंतर त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी महाबळेश्वर नाट्यपरिषद पदाधिकारी तसेच पत्रकार विलास काळे, संजय दस्तुरे, अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, रोहित ढेबे, संदीप मोरे, गणेश ढेबे, अनिकेत आदी उपस्थित होते.

Bhau Kadam

या धावत्या भेटीत पत्रकारांबरोबर अनौपचारिक गप्पा मारताना भाऊ कदम यांनी, आपल्याला हा परिसर व येथील निसर्ग नेहमीच भुरळ पाडत असतो. सध्या या दोन्ही पर्यटस्थळांवरील पावसाळी वातावरण व या परिसरातून दिसणारा पावसाळी निसर्गाची विलोभनीय दृश्ये अत्यंत मोहक, मनाला भुरळ पाडणारी व अविस्मरणीय आहेत. त्याचाच मोह झाल्याने काही वेळ मी येथे घालविला तसा इतर निसर्गप्रेमींनी ही आपल्या सोईनुसार कोरोनाचे (Coronavirus) सावट संपल्यावर, तो येथे येऊन घालवावा व आजच्या धावपळीच्या जीवनात येथून नव चैतन्य घेवून जावे, असे आवाहन त्यांनी केले. महाबळेश्वर नाट्य परिषदेने भविष्यात कधी नाट्य संमेलन आयोजित केले, तर महाबळेश्वर-पाचगणी रसिकप्रेमींसाठी व रसिकांसाठी आपण आवश्य सहकार्य करू, अशी खात्री भाऊ कदम यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

Chala Hawa Yeu Dya Fame Bhalchandra Kadam Visit To Mahabaleshwar Panchgani Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT