सातारा

खंडणीप्रकरणी महिलेसह कोडोलीच्या दोघांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : महिलेशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत बेकरीमध्ये काम करणाऱ्या एकाकडून 70 हजार रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर मंगळवारी रात्री खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. जयश्री दिलीप यादव व आनंद शिंदे (दोघेही रा. अहिरे कॉलनी, कोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

गोडोली येथील साई मंदिर परिसरात महेश हणमंत धनावडे हे राहण्यास आहेत. धनावडे हे एका बेकरीत कामास असून कामादरम्यान त्यांची एका महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे नंतरच्या काळात घनिष्ठ संबंधांत रुपांतर झाले. त्याची माहिती जयश्री यादव व आनंद शिंदे यांना मिळाली. त्या दोघांनी महेश धनावडे व त्यांच्या मैत्रिणीच्या घनिष्ठ संबंधांचे मोबाईलवर शुटींग केले. हे शुटींग व्हायरल करण्याची धमकी दोघांनी धनावडे यांना फोनवरुन देण्यास सुरुवात केली. 

16 जून 2019 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत वारंवार फोन करत त्या दोघांनी धनावडे यांच्याकडून 70 हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या दोघांनी धनावडेकडे चार लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे न दिल्यास घनिष्ठ संबंधांची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी त्या दोघांनी धनावडे यांना दिली. वारंवारच्या धमक्‍यांना वैतागून धनावडेंनी बुधवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार जयश्री यादव, आनंद शिंदे या दोघांवर खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. हवालदार गुलाब जाधव हे तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT