Chief Minister Eknath Shinde Esakal
सातारा

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द, कारणही आलं समोर...

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादनासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री येतात. यंदा मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कऱ्हाडला न येता त्यांच्या समाधीकडे पाठच फिरवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी-सकाळी अभिवादनासाठी येवून पुणे गाठले.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादनासाठी अपवाद वगळता दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री येथे येतात. जेष्ठ नेते चव्हाण यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यानिमीत्त अभिवादनासाठी मुख्यमंत्री शिंदे हे येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यांनी यंदा अभिवादनासाठी न येता समाधीकडे पाठ फिरवली.

दरम्यान उपमुख्यमंत्री पवार हे काल शुक्रवारी रात्रीच कऱ्हाडला मुक्कामी आले. त्यांनी आज शनिवारी सकाळी- सकाळी सात वाजताच काही मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत समाधीस्थळ गाठले. त्यांनी जेष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन सकाळी साडेसात वाजताच ते पुण्यासाठी रवाना झाले.

मुख्यमंत्री यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या हेलिकॉप्टर मधून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे कराड विमानतळावर दाखल झाले. मुख्यमंत्री न येण्याचे कारण ते आजारी असल्याचे सांगितले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा कराड दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

Junnar Khirehwar News: जुन्नरच्या खिरेश्वरमध्ये माती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध माती वाहतूक करणारे वाहन जप्त

Amravati Crime : दोन पीडितांवर अमरावतीमध्ये अत्याचार; आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटीचे गठण

SCROLL FOR NEXT