सातारा

मराठवाडी धरणाचे दांडगाव्याने बांधकाम केल्यास याद राखा; 'जनजागर'चा प्रशासनाला इशारा

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : धरणग्रस्तांचे प्रश्न लोंबकळत ठेऊन मराठवाडी धरणाचे बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास धरणस्थळी आंदोलन उभारू, असा इशारा जनजागर प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. 

मराठवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 2.73 टीएमसी असून, सद्यःस्थितीस 1.4 टीएमसी पाणी साठविण्याइतपत धरणाचे बांधकाम झालेले आहे. पावसाळ्यात बंद ठेवलेले धरणाचे बांधकाम आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असल्याने धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जनजागर प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जोपर्यंत 100 टक्के पुनर्वसन होत नाही तो पर्यंत बांधकाम सुरू करू नये अन्यथा त्यास विरोध करून धरणस्थळी आंदोलन उभारू, असा इशारा दिला. निवेदनावर जनजागरचे राज्य समन्वयक देवराज देशमुख, मुख्य संघटक जितेंद्र पाटील, जगन्नाथ विभूते, तानाजी सावंत, सुनील पवार यांच्या स्वाक्षऱ्या असून, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनाही त्याच्या प्रती पाठविल्या आहेत. प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास जाण्याच्या स्थितीत असताना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच ठेवल्याने अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. सर्व स्तरावर पाठपुरावा सुरू असतानाही न्याय मिळालेला नाही. बैठकीसाठी वेळ मागूनही दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे याप्रश्नी तातडीने बैठक आयोजित करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. 

धरणग्रस्तांच्या ठळक मागण्या 

  • माहुली गावठाणात विस्थापित होणाऱ्या धरणग्रस्तांचे चारपट जमीन, निर्वाह भत्ता आदी प्रश्न मार्गी लावावे. 
  • मेंढ गावठाणासाठी त्वरित जमीन संपादित करून भूखंड वाटप व सुविधांची कामे सुरू करावीत. 
  • मेंढ गावठाणातील मंदिर बांधकामास अडथळा ठरणारी वीज वहिनी हटवावी. 
  • सावंतवाडी- जिंती येथील जमिनीऐवजी रोख रक्कम मागणीचा प्रलंबित प्रश्न सोडवावा. 
  • कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील विस्थापितांच्या खात्यावर रोख रक्कम जमा करावी. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

रस्त्यावर दयनीय अवस्थेत फिरताना दिसली नासिरुद्दीन शाहची ही अभिनेत्री; सतत एकच गोष्ट बोलत होती...

Tesla Car: एक पाऊल पुढेच! मुख्यमंत्री आले अन् कार पाहून गेले, शिंदेंनी घेतली टेस्ट ड्राईव्ह, Video Viral

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

SCROLL FOR NEXT