सातारा

उपचाराअभावी जीव गमवावा लागतोय; आरोग्य सेवेसाठी पाचगणीकर आक्रमक

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : पाचगणी शहरातील आरोग्यसेवा वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सूचना द्याव्यात व पालिकेने तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करावी, या मागणीचे निवेदन नुकतेच पाचगणीकरांनी नगरपालिकेला दिले. 

या निवेदनाच्या प्रती आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्यावर किशोर कांबळे, सुनील खंडारे, किसन घाडगे, राहुल कांबळे, अशोक चव्हाण, राजेश्वर कांबळे, अजित मालुसरे, राजेंद्र भंडारी, जालिंदर चोपडे यांच्या सह्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे, की पाचगणीतील निवासी शाळांमधील विद्यार्थी, येणारे पर्यटक आणि शहराबरोबरच परिसरातील सुमारे 20 ते 30 गावांचा आरोग्याचा भार हा या शहरावर येतो. येथे खासगी डॉक्‍टरांचे दवाखाने आहेत. त्यातील बरेचसे दवाखाने सध्या कोरोनामुळे बंद आहेत. काहींकडे डॉक्‍टर नाहीत, तर काहींमध्ये डॉक्‍टर असूनही अत्यावश्‍यक सेवेच्या वेळी सेवा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

त्यामुळे येथील रुग्णांना वाई व साताऱ्याला धाव घ्यावी लागते. या शोधाशोधीत रुग्ण दगावण्याचा धोका आहे. पाचगणीतील युवकाला अशाच प्रकारे प्राण गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी पाचगणी, गोडवली व खिंगर येथेही अशाच प्रकारे वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे खासगी व शासकीय आरोग्य यंत्रणेला सूचना करून सर्वसामान्य रुग्णांना सेवा द्यावी. पाचगणीत रुग्णवाहिका नसल्याने बऱ्याचदा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास रुग्णांना वेळेत दवाखान्यापर्यंत नेता येईल. त्यासाठी पालिकेने तातडीची शहरवासियांना रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT