Lonand-Phaltan Road esakal
सातारा

जीप पलटी झाल्यानं जेजुरीहून धुळदेवकडं निघालेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू

रमेश धायगुडे

देवदर्शनासाठी निघाले असताना काळजजवळ आल्यानंतर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला.

लोणंद (सातारा) : लोणंद-फलटण रस्त्यावर (Lonand-Phaltan Road) काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळज (ता. फलटण) जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) नुकतेच लग्न झालेल्या आणि जेजुरीहून धुळदेवकडे (ता. फलटण) निघालेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले आहेत.

याबाबत लोणंद पोलिसांकडून (Lonand Police) मिळालेली माहिती अशी, बार्शी (जि. सोलापूर) येथील नुकतेच लग्न झालेले नवरदेव सुखदेव रवींद्र वाघमोडे (वय २६) हे आपल्या लग्नानंतर देवदर्शनासाठी जीपगाडीतून नातेवाईकांसमवेत जेजुरी येथून लोणंद-फलटण रस्त्यावरून फलटण तालुक्यातील (Phaltan Taluka) धुळदेव या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळजजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. त्यामध्ये नवरदेव सुखदेव हा गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने फलटण येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच तो मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, जीप गाडीतील अन्य काही जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात (Lonand Police Station) रात्री उशिरा करण्यात आली. लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सध्‍या लोणंद-फलटण रस्त्याच्या सहापदरीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे करताना संबंधित यंत्रणेकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावर अपघातांच्या घटना घडत आहेत, अशा प्रतिक्रिया वाहनचालक व प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT