Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या भूषणगडावर मावळ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : इतिहासाचा साक्षीदार असलेल्या भूषणगड किल्ल्यास भेट देत साताऱ्यातील मावळ्यांनी तेथील परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. युवकांच्या या बांधिलकीचे विशेष कौतुक होत आहे. 

भूषणगड हा खटाव तालुक्‍यातील ऐतिहासिक किल्ला. साताऱ्यातील युवकांनी अलीकडेच या किल्ल्यास भेट दिली. "रक्षक ग्रुप'च्या माध्यमातून हे युवक कार्यरत असतात. गडकोटांचे संवर्धन, संरक्षणाच्या हेतूने या ग्रुपचे कार्य सध्या सुरू आहे. त्यात 50 युवकांचा समावेश आहे. या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने, स्वयंप्रेरणेने भूषणगडावर स्वच्छता मोहीम राबविली. गडाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. परिसरात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या गोळा केल्या. 

या उपक्रमास पाच वर्षांच्या सदस्यापासून युवकांपर्यंत सर्वांचाच महत्त्वपूर्ण हातभार लागला. या मोहिमेत युवतींचाही उल्लेखनीय सहभाग होता. रक्षक ग्रुपचे अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष आकाश राऊत, सचिव धनंजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ले रायगड तसेच नाशिकलगत असलेल्या हरिहर या किल्ल्यांनाही ग्रुपच्या सदस्यांनी अलीकडेच भेट दिली होती. शिवरायांचे विचार समाजात रुजविणे, तसेच गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन करणे हा रक्षक ग्रुपचा हेतू असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Sharad Pawar: सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Badminton : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू दोन वर्षानंतर जेतेपदाची लढत खेळणार; Japan Open च्या फायनलमध्ये प्रवेश

Donald Trump: FIFA फायनलमध्ये ट्रम्पची एंट्री! विजेत्या खेळाडूंना मिळणार सोन्याची खास अंगठी

SCROLL FOR NEXT