Bhairoba Area esakal
सातारा

शाब्बास! पेढ्याचा भैरोबा परिसरात श्रमदानातून साफसफाई; युवकांकडून 25 पोती कचरा गोळा

पेढ्याचा भैरोबा हे गडकर आळीत राहणाऱ्यांचे ग्रामदैवत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : येथील पेढ्याचा भैरोबा परिसरात (Bhairoba Area) रात्रीच्या वेळेस रंगणाऱ्या पार्ट्यांमुळे परिसरात मोठा कचरा जमा झाला होता. या कचऱ्याची सफाई नुकतीच युवकांनी तसेच ग्रामस्थांनी करत 25 पोती प्लॅस्टिक बाटल्या जमा केल्या. या परिसरावर रात्रीच्या वेळेस लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक युवकांचे गस्तीपथक तयार करण्यात आले आहे. (Cleaning Of Bhairoba Area In Satara by Youth Satara News)

पेढ्याचा भैरोबा हे गडकर आळीत राहणाऱ्यांचे ग्रामदैवत असून काही वर्षांपूर्वी डोंगरावर असणाऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी श्रमदानातून पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांवर रात्रीच्या सुमारास युवक पार्टी करण्यासाठी जमतात. या युवकांनी फेकलेल्या बाटल्या व इतर साहित्यामुळे पायरी मार्गावर कचरा जमा झाला होता. हा कचरा साफ करण्यासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घेत श्रमदान केले. युवकांनी 25 पोती प्लॅस्टिक तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा करत त्याची विल्हेवाट लावली. आगामी काळात मंदिर परिसराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी रात्री पार्ट्या करणाऱ्यांना त्या परिसरात जाण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक युवकांचे गस्तीपथक तयार करण्यात आले आहे.

राज्यावर कोरोना संकट! महिन्याचे वेतन देऊन 'त्यांनी' जपली सामाजिक बांधिलकी

Cleaning Of Bhairoba Area In Satara by Youth Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT