Five Hundred esakal
सातारा

Lockdown : आता विनाकारण घराबाहेर पडल्यास होणार पाचशे रुपयांचा दंड

काही नागरिक मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : काही नागरिक मास्कचा (Mask) वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तींकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी दिले आहेत. (Collector Shekhar Singh Fined The Citizens Five Hundred Rupees Satara News)

शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्‍यक बाबी, अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकार राहिल, असे कळविले असताना देखील अनेकजण मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे विनाकारण मास्कविना बाहेर पडणाऱ्यांकडून पाचशे रूपये दंड आकारण्यात यावा.

या दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी व शहरी भागात पोलिस विभाग, संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

Collector Shekhar Singh Fined The Citizens Five Hundred Rupees Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT