Nana Patekar esakal
सातारा

Nana Patekar : राजकारणापासून सामान्य माणसांनी दूर राहावं; नाना पाटेकरांचा मोलाचा सल्ला

सामूहिक प्रयत्नांतून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती केल्यास नक्कीच यश मिळेल.

सूर्यकांत पवार

समाजासाठी प्रत्येक माणसाने योगदान द्यावे. मला काय मिळते यापेक्षा मी काय देतो, याचा विचार करावा.

कास : सामूहिक प्रयत्नांतून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती केल्यास नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांनी तळदेव येथे केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या दुरुस्तीसाठी नाम फाउंडेशनच्या मदतीने ८५ गावांतील १८०० शेतकऱ्यांची ९०० एकर शेती आणि २० किलोमीटर नदी व ओढे दुरुस्तीचे काम झाले. या कामाचा लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंद्रजित देशमुख, चंद्रशेखर एल. एस., क्षिप्रा माथूर, संजय नाईक प्रमुख म्हणून उपस्थित होते.

पाटेकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करावी. राजकारणापासून सामान्य माणसांनी दूर राहावे. राजकीय लोकांकडून विकास करून घ्यावा. समाजासाठी प्रत्येक माणसाने योगदान द्यावे. मला काय मिळते यापेक्षा मी काय देतो, याचा विचार करावा. १०५ गाव या सामाजिक संघटनेचे काम चांगले आहे. भविष्यात आपण समाजोपयोगी काम करू.’’ या वेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत गप्पा मारत प्रश्न समजून घेतले. तळदेव हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्‌घाटन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कोयना, सोळशी, कांदाटी आणि बामणोली विभागातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नाम फाउंडेशनचे समन्वयक गणेश थोरात, घनश्याम सकपाळ, कार्याध्यक्ष डी. के. जाधव, उपाध्यक्ष सुभाष सोंडकर, सचिव गणेश उतेकर, बी. व्ही. शेलार, किसन जाधव, वसंत शिंदे, जगन्नाथ मोरे, हरिभाऊ कदम, लक्ष्मण जाधव, संजय उतेकर, शांताराम कदम, गोविंद शिंदे, सोमराज शिंदे, राजेश जाधव आदींनी परिश्रम घेतले. संजय संकपाळ आणि संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संदीप उतेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

Latest Marathi News Live Update : खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाण्यात दाखल; पाणीटंचाईवर मोठा दिलासा

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

SCROLL FOR NEXT