सातारा

सरकारची हुकूमशाही मोडीत काढू; कॉंग्रेस नेत्याची जनेतला साद

शशिकांत धुमाळ

निमसोड (जि. सातारा) : डिझेल, पेट्रोल, गॅसची दररोज होणारी भरमसाट वाढ, महागाईचा उंच्चाक, चुकीचे शेतकरी धोरण व ढासळलेली अर्थव्यवस्था हे सर्व केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा परिपाक आहे. जनतेच्या मदतीतून ही हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे नुकताच दिला.
 
येळीव (ता. खटाव) येथे हरणाई सहकारी सूतगिरणीत संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार व खटाव तालुक्‍यातील शिक्षक मतदारांशी हितगुज असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर घार्गे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अशोक गोडसे, राजेंद्र शेलार, अधिकराव चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ""केंद्र सरकारने कोरोनाच्या नावाखाली आरोग्य विभागासाठी 132 टक्के दाखवलेली वाढ बोगस आहे. त्यासाठी शिक्षण खर्च सुद्धा 8 टक्‍क्‍याने कमी केला आहे. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात चालला आहे. 12 कोटी लोकांचा कोरोनामुळे रोजगार गेला आहे. प्रत्येक देशात अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी सरकार व्यावसायिकांसह छोट्या मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी तेथील सरकार काही टक्के अनुदान देत आहे. याउलट भारतात 27 रुपये उत्पादन खर्चावर 70 रुपये कर लावत आहे. भरमसाट इंधन दरवाढ व शेतकरी आंदोलन यामुळे जनतेतून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.'' कोरोनाची दुसरी लाट पुन्हा डोक वर काढत आहे. खबरदारी घ्या अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्‍यता नाकरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
 
आमदार आसगावकर म्हणाले, ""महाविकास आघाडीने सहापैकी पाच जागा जिंकून यापुढील काळातील विजयाची लिटमस टेस्ट जिंकून पुणे पदवीधर- शिक्षक आमदारांची भाजपची मक्‍तेदारी मोडीत काढली आहे.'' शिक्षणमंत्र्यांची वर्षातून एकदा प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक व संस्था चालकांसाठी आढाव बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
देशमुख म्हणाले, ""खटाव- माण तालुक्‍यांतील सर्व माजी आमदारांच्या पाठपुराव्यामुळे व आम्ही केलेल्या आंदोलनामुळेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच उरमोडीचे पाणी व पृथ्वी बंधाऱ्याचे काम झाले आहे. मात्र, खोटा बुरखा पांघरलेले एकटेच श्रेय घेताना ढोल बजावत आहेत.'' या वेळी प्रभाकर घार्गे, डॉ. सुरेश जाधव, सुरेंद्र गुदगे, संजीव साळुंखे यांची भाषणे झाली. आर. एन. पवार व राजेंद्र जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश गुरव यांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT