सातारा

सातारकरांनाे गुड न्यूज : पृथ्वीराज चव्हाणांमुळे महत्त्वाचा प्रश्न सुटला

विकास जाधव

काशीळ (जि.सातारा) :  सध्या कोविडमुळे बेडची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व सर्वांच्या चर्चेतून काशीळ ग्रामीण रुग्णालयाचा विचार केला असून, येथे आयसीयूचे 50 बेड बसू शकतील. पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होईल, असे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, पुढील काळात काशीळ ग्रामीण रुग्णालयात ट्रामा सेंटर सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कशात अडकली पोलिसांची रेनकोट खरेदी
 
येथील ग्रामीण रुग्णालय कोविडच्या रुग्णांसाठी वापरता येईल का, यासाठी आमदार चव्हाण यांनी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, कार्यकारी अभियंता दराडे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, सामाजिक कार्यकर्ते भरत माने, सरपंच सुभाषराव जाधव, उपसरपंच कामिनी तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत कुंभार, चंद्रकांत जगताप, माजी सरपंच अंकुश माने, प्रकाश जाधव, धनाजी माने, सुरेश माने आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादीच्या कट्टर नेत्याची 'या' निवडणुकीतून माघार; स्वतः केले जाहीर

कण्हेरकरांचा एकच निर्धार, गावातून कोरोनाला करणार हद्दपार

आमदार चव्हाण म्हणाले, ""सर्व सोयीसुविधांयुक्त रुग्णालय व्हावे, अशी मागणी या परिसरातील अनेक गावांतील लोकांची होती. त्यानुसार येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. या रुग्णालयास उभारणीसाठी पाच वर्षे झाली असून, बांधकाम अंतिम टप्यात आहे. सध्या कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त बेडची गरज निर्माण झाल्याने या इमारतीचा विचार केला असून, पुढील आठ दिवसांत आवश्‍यक कामे पूर्ण केली जातील. सातारा व कऱ्हाड या शहरांच्या मध्यवर्ती हे रुग्णालय असल्याने येथे ट्रामा सेंटर व सर्व स्टाफची निवासाची सोय करणार आहे.'' या वेळी रुग्णालय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

संपादन : संजय शिंदे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT