National Congress Party
National Congress Party esakal
सातारा

ठरलं! ZP साठी काँग्रेसचा 'टाॅप प्लॅन'

उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress Party) बालेकिल्ल्यात काँग्रेसने (National Congress Party) आपली जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) गेलेली ताकद पुन्हा परत मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गावनिहाय बूथ (Village Wise Booth) बांधणीसह सुपर ३० फॉर्म्युल्याचा वापर करत रणनीती आखली जात आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांच्या माध्यमातून गटनिहाय बैठका सुरू केल्या जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत (Local Body Election) स्वबळाचा नारा दिल्याने आता जिल्ह्यातील नेत्यांना ‘चार्ज’ करून नव्या जुन्यांचा संगम करत या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून होणार आहे. (Congress Party Super 30 Formula For Zilla Parishad Election Political News bam92)

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने आपली जिल्हा परिषदेतील गेलेली ताकद पुन्हा परत मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे; पण काँग्रेसच्या हातून सर्व राजकीय सत्तास्थाने राष्ट्रवादीने काढून घेतली. आता जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव आमदार, सात जिल्हा परिषद सदस्य अशी अवस्था आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात सातत्याने गटबाजीचे राजकारण राहिले. याचा फायदा राष्ट्रवादीने उठविला. आता यावेळेस होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी (Panchayat Committee Election) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळचा नारा दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आता यानिमित्ताने आपली गेलेली जिल्हा परिषदेतील ताकद परत मिळविण्याची संधी आली आहे. यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आगामी सात महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बूथ बांधणी, तसेच सुपर ३० चा फॉर्म्युला जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटनिहाय बैठका घेऊन काँग्रेस पक्षाचे विचार गावपातळीपर्यंत पोचविण्याचे व निवडणुकीची रणनीती ठरविण्याचे काम सुरू होणार आहे.

जिल्हा परिषदेचे किमान ३० गटांत काँग्रेसचे प्राबल्य राहावे, यासाठी प्रयत्न सुरू असून, यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुकीत तरुणांना जास्तीतजास्त संधी देण्यावर भर दिला जाणार आहे, तसेच काही ठिकाणी जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणूक लढली जाणार आहे. काँग्रेसने नुकतीच नव्याने काही पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे. या पदाधिकाऱ्यांवर या निवडणुकीत विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. त्याबरोबरच सोशल मीडियाचा वापर करून तरुणांच्या माध्यमातून काँग्रेसची भूमिका सर्वसामान्य युवकांपर्यंत पोचविली जाणार आहे, तसेच बूथ बांधणीवर ही विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी आतापासून नियोजन करण्याची तयारी केली आहे.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालणार?

सातारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक ३९ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसचे सात, भाजपचे सात आणि शिवसेनेचे दोन, अपक्ष दोन, तसेच तीन विकास आघाड्यांचे सात सदस्य आहेत. यावेळेस राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाल्यास त्यांना काँग्रेस व भाजपसोबत दोन हात करावे लागतील. त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सातारा जिल्ह्यात किती प्रभावीपणे चालणार यावर सर्व अवलंबून आहे.

Congress Party Super 30 Formula For Zilla Parishad Election Political News bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT