Kirit Somaiya Controversial Video esakal
सातारा

Kirit Somaiya विरोधात काँग्रेस आक्रमक; सोमय्यांची प्रतिमा पायदळी तुडवत महिलांनी मारले जोडे

भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हे यातून दिसून येत आहेत.’’ महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आता काय झोपल्या आहेत का?

सातारा : भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. साताऱ्यात काँग्रेसच्या (Congress) महिला आघाडीच्या वतीने सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. त्यांची प्रतिमा पायदळी तुडवून निषेध नोंदवला.

काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनासमोर आंदोलन झाले. या वेळी धनश्री महाडिक, रजनी पवार, रजिया शेख, मालन परळकर, माधवी वर्पे, वहिदा खान, नसीम बागवान, नरेश देसाई, मनोजकुमार तपासे आदी उपस्थित होते. या वेळी खासदार सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेस भवनासमोर सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले, तसेच त्यांची प्रतिमा पायदळी तुडवत त्यांचा निषेध करण्यात आला. या वेळी अल्पना यादव म्हणाल्या, ‘‘किरीट सोमय्या हे प्रत्येकाला ईडीची भीती दाखवून चुरुचुरू बोलत होते. आज त्यांचीच सीडी बाहेर आली आहे. त्यांनी महिलांवर अत्याचार केले आहेत.

त्याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हे यातून दिसून येत आहेत.’’ महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आता काय झोपल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून यादव यांनी काँग्रेसच्या महिला सोमय्यांचे पितळ उघडे करणार असल्याचे सांगून निषेध व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

SCROLL FOR NEXT