Nana Patole  sakal
सातारा

Nana Patole : आगामी काळात पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात त्याचे भान ठेवा आणि राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेट द्या, शेतकरी आत्महत्या करत आहेत याकडे लक्ष द्या, आगामी काळात पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

हेमंत पवार

कऱ्हाड : सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात त्याचे भान ठेवा आणि राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेट द्या, शेतकरी आत्महत्या करत आहेत याकडे लक्ष द्या, आगामी काळात पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. महाराष्ट्रात कॉंग्रेस लोकसभेच्या सर्व जागा जिंकेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष पटोले आज गुरुवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळावरुन भुईंजला रवाना होण्यासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, प्रा. धनाजी काटकर, कॉंग्रेसचे कऱ्हाड उत्तर अध्यक्ष निवासराव थोरात, माजी नगरसेवक अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीने संविधान वाचवा म्हणून प्रचार केला, पण त्याचा घटक पक्ष असलेल्या एका आमदाने संविधानाच्या विरोधात कृती केला आहे या प्रश्नावर ते म्हणाले, याचे उत्तर जितेंद्र आव्हाडच देतील मात्र बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले गेले याचे समर्थन कोणीही करणार नाही. पण मनुस्मृती अभ्यासात यावी हा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेस पक्षाचा नेहमीच विरोध राहील. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव असुन तो ग्रंथ कालबाह्य झाला आहे.

ते म्हणाले, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे ते शेवटचेच ध्यान आहे. काँग्रसने त्यांच्या ध्यानाची धास्ती घेतलेली नाही. भाजपने पेरलली ती आफवा आहे. आम्हाला त्यांच्या ध्यानाची धास्ती नाही. फक्त सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमातून येवू नये, अशी आमची अपेक्षा आहे. आणि नरेंद्र मोदी म्हणून त्यांना पुढील काळात आता ध्यानच करत बसायचे आहे.

पुण्यातील घटनेचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे

गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. श्रीमंत लोक, त्यांची मुलं पबमध्ये राहतील तेथून गाडीची रेस लावुन गरीबांना चिरडून टाकतील. आम्ही त्यावर बोललो की सत्ताधाऱ्यांना स्टंट वाटत आहे असे सांगुण श्री. पटोले म्हणाले, पुणे अपघातात त्या गाडीत कोण कोण होते हे पुढे का येत नाही ? पोलीस प्रकरण का दाबत आहेत ? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कारण दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. राज्याच्या जनतेने कोणाकडे दाद मागावी हा प्रश्नच आहे. त्यामध्ये कोणाचा दबाव आहे हे सगळे समोर आले पाहिजे. श्रीमंतांना वेगळा कायदा आहे का ? या प्रकरणी जनता भयभीत आहे म्हणून मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : रेशनवर मिळालेले खराब धान्य शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवले

SCROLL FOR NEXT