Congress Party
Congress Party esakal
सातारा

'नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढून सत्ता स्थापन करणार'

राजेंद्र वाघ

गेल्या वेळी काँग्रेसने आठ जागा संपादन करून राष्ट्रवादीबरोबर भागीदारीत सत्ता स्थापन केली होती.

कोरेगाव (सातारा) : कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक (Koregaon Nagar Panchayat Election) काँग्रेस पक्ष (Congress Party) स्वबळावर लढवेल आणि स्वबळावर सत्ताही स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे निरीक्षक आणि प्रदेश प्रतिनिधी बाबूराव शिंदे (Baburao Shinde) यांनी व्यक्त केला. कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी तालुका काँग्रेस समितीच्या संपर्क कार्यालयात आज प्राथमिक बैठक झाली. त्यात श्री. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत चव्हाण होते.

कोरेगाव नगरपंचायतीत एकूण १७ सदस्य असून, गेल्या वेळी काँग्रेसने आठ जागा संपादन करून राष्ट्रवादीबरोबर (NCP) भागीदारीत सत्ता स्थापन केली होती. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘भविष्याचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कोरेगावच्या विकासाचा विचार व्हायला हवा. काँग्रेस पक्ष काही महत्त्वकांक्षी योजनांचे वचन कोरेगावच्या जनतेला देऊ इच्छित असून, या कार्यक्रमावर आधारित हा पक्ष निवडणुकीला सामोरा जाईल. कोरेगावातील पक्षाचे सर्व नेते- कार्यकर्ते यांनी एकत्रित बसून समन्वयाने उमेदवार निश्चित करण्याच्या आणि त्यासाठी संसदीय समिती स्थापन करून विकासाचा जाहीरनामा करण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी राजकीय संस्कृती निर्माण केली; परंतु अलीकडच्या काळात या सत्ता स्पर्धेला पैशाचे आणि सवंग- उथळ राजकारणाचे स्वरूप आले. या राजकारणाच्या मार्गाने कोरेगावचे भले होणार नाही. कोरेगावने आता स्वतःचे नेतृत्व पुढे आणले पाहिजे. नगरपंचायतीची होणारी निवडणूक हे त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल.’’

Koregaon Nagar Panchayat Election

तालुकाध्यक्ष चव्हाण म्हणाले, ‘‘कोरेगावच्या निवडणुकीसाठी पक्ष पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ही निवडणूक काँग्रेससाठी दिशादर्शक ठरणार आहे.’’ सुरुवातीला निवडणुकीसंदर्भात इच्छुकांनी मते व्यक्त करून उपयुक्त सूचना केल्या. ॲड. अभिजित केंजळे यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष मनोहर बर्गे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुनील भोसले, सम्राट बर्गे, धनंजय बर्गे, युवराज बर्गे, जयवंतराव केंजळे, अजित बर्गे, अमरसिंह बर्गे आदी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निवास थोरात यांनी निवडक कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT