satara sakal
सातारा

Contract Recruitment : कंत्राटी भरतीचा जीआर काढताना गुंगीत होता? पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना सवाल

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राटी भरतीचा

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

सातारा - कऱ्हाड ज्या अद्यादेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला विचारत आहेत त्यांनी सप्टेंबरला २०२३ ला जो कंत्राटी भरतीचा उद्यादेश काढला तेव्हा ते काय काय गुंगीत होते का ? जनतेचा रेटा सुरु झाल्यानंतर घाईगडबडीत तुम्ही तुमचाच सप्टेंबरमध्ये काढलेला अद्यादेश रद्द केला. अद्यादेश रद्द करायचा होता तर तो काढलाच कशाला ? असा उलट सवाल आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे.

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राटी भरतीचा उद्यादेश काढल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान नांदेडसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर आमदार चव्हाण यांनी आज येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे,

अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, जावेद शेख, शुभम लादे आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी रिक्त असलेली वैद्यकीय डॉक्टरांची संख्या, रुग्णालयात असणाऱ्या इतर सुविधा व समस्या याचा प्रभारी वैधकीय अधिक्षक राजेश शेडगे यांच्याकडून आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, शासनाने आरोग्य विभागाचे पदे भरण्यामध्ये गलथानपणा केला आहे.

शासनाकडून पैसे वाचविण्याचा प्रयत्न चालला आहे. सगळे कंत्राटीकरण चालले आहे. जोपर्यंत पूर्णवेळ, जबाबदार डॉक्टरांची नेमणूक होत नाही तोपर्यंत काम व्यवस्थीत होणार आहे. आरोग्य यंत्रणेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष शासनाचे झाले आहे. विधानसभेत त्यावर आवाज उठवावा लागणार आहे.

ते म्हणाले, ज्या अद्यादेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला विचारत आहेत त्यांनी सप्टेंबरला २०२३ ला जो कंत्राटी भरतीचा उद्यादेश काढला तेव्हा ते काय काय गुंगीत होते का ? जनतेचा रेटा सुरु झाल्यानंतर घाईगडबडीत तुम्ही तुमचाच सप्टेंबरमध्ये काढलेला अद्यादेश रद्द केला. अद्यादेश रद्द करायचा होता तर तो काढलाच कशाला ?

५० बेडचा प्रस्ताव पाठवण्याची सुचना

कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय असून सध्या १३८ बेडव्दारे रुग्णावर उपचार सुरू आहेत. अजून ५० बेड मंजुरीसाठी अवश्यकता आहे. त्यानुसार त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवा अशा सुचना आवाहन आमदार चव्हाण यांनी वैद्यकीय अधिक्षकांना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP Mumbai Manifesto : मुंबईसाठी आपची "केजरीवाल की गॅरंटी," २४ तास पाणीपुरवठा ते २०० युनिटपर्यंत मोफत वीज; जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं

PMC Election 2025 : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीत 'एबी फॉर्म'वरून राडा! "उमेदवार अजित पवारांनीच ठरवले", ज्येष्ठ नेत्यांचा घरचा आहेर

Jalgaon Municipal Election : जळगावात उमेदवारीचा महापूर! शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज; एकूण उमेदवारांचा आकडा १००० पार

New Year 2026: नव्या वर्षात राशीनुसार ‘या’ मंत्रांचा जप करा, नशिबाची चावी तुमच्याच हातात!

साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीत येणार! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीचा ‘पुणे पॅटर्न;’ जाेरदार हालचाली सुरू..

SCROLL FOR NEXT