सातारा

नवकवी बा. सी. मर्ढेकर स्मारकास कूपर उद्योगची ग्रंथसाहित्य भेट

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : मराठी कवितेला एक नवा चेहरा मिळवून देणाऱ्या नवकवी बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांचा आज जगभरात अभ्यास केला जातो. त्यांचे साहित्य जीवनाला प्रेरणादायी व मार्गदर्शक असे असल्याने आजच्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन ग्रामीण कथा लेखक, कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या साहित्याचे अभ्यासक अजित जाधव यांनी केले.

मर्ढे (ता. सातारा) येथे बा. सी. मर्ढेकर स्मारक सभागृहात नवकवी बा. सी. मर्ढेकर यांची 111 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी श्री. जाधव बोलत होते. या प्रसंगी मर्ढेकर स्मारक समितीचे सदस्य श्रीनिवास वारुंजीकर, सरपंच शरद शिंगटे, मानसिंग शिंगटे, उमेश शिंगटे, ऍड. सचिन चव्हाण, उपसरपंच अमोल शिंगटे, उमेश कुलकर्णी, अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल 

यावेळी श्री. वारुंजीकर म्हणाले, ""कूपर उद्योग समूहाच्या वतीने नवकवी बा. सी. मर्ढेकर स्मारकासाठी भेट देण्यात आलेले ग्रंथसाहित्य फार मोलाचे ठरणार आहे.'' या प्रसंगी अनेकांनी आपल्या कविता सादर केल्या. मात्र, अजित जाधव यांनी "किती पायी लागू तुझ्या, किती आठवू ग तुते, किती शब्द बनवू, अब्द अब्द मनी येते' ही मर्ढेकरांची कविता सादर करून मर्ढेकरांना श्रध्दांजली वाहिली. प्रारंभी बा. सी. मर्ढेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सरपंच शिंगटे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कुलकर्णी यांनी आभार मानले.

बा. सी. मर्ढेकर स्मारक लोकार्पणाचा अधिकार हवाय ग्रामस्थांना

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT