Corona esakal
सातारा

चिंताजनक! साताऱ्यात 24 तासात 2110 जण बाधित, तर 44 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) आता नियंत्रणात येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. सध्या रुग्णांचा रोजचा आकडा दोन ते अडीच हजार या दरम्यान स्थिर असून पहिल्या लाटेचा अभ्यास करता येत्या आठवड्यानंतर वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात येऊन कोरोनाची गती मंदावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याला काही दिवसात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2110 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 2110 Citizens In Satara District Today)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 106 (6340), कराड 206 (19189), खंडाळा 134 (8263), खटाव 191 (11713), कोरेगांव 188 (11409), माण 140 (8915), महाबळेश्वर 55 (3636), पाटण 114 (5523), फलटण 277 (17756), सातारा 461 (29915), वाई 221 (9842 ) व इतर 17 (770) असे आजअखेर एकूण 133271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 4 (139), कराड 11 (544), खंडाळा 0 (107), खटाव 4 (321), कोरेगांव 0 (271), माण 5 (174), महाबळेश्वर 0 (40), पाटण 1 (134), फलटण 3 (228), सातारा 14 (885), वाई 2 (262) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3105 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 2110 Citizens In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT