Corona Test esakal
सातारा

धोका कायम! पुणे, मुंबई, ठाण्याचा वेग मंदावला; साताऱ्यात बाधितांच्या आकड्यात वाढ

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असताना आता तो आणखीन सहा दिवस वाढला असून यामध्ये नियम पाळून संसर्ग साखळ्या तोडण्याचे आव्हान जिल्ह्या समोर आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या मोठ्या जिल्ह्यामध्ये बाधित वाढीचा वेग दिलासादायक मंदावला आहे. मात्र, साताऱ्यात कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2257 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Corona Patient) आले असून 24 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Corona Test Positive Of 2257 Citizens In Satara Today)

पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या मोठ्या जिल्ह्यांत बाधित वाढीचा वेग दिलासादायक मंदावला आहे. मात्र, साताऱ्यात कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 58 (7372), कराड 213 (21922), खंडाळा 82 (10194), खटाव 247 (15322), कोरेगांव 126 (13913), माण 75 (10987), महाबळेश्वर 4 (3969), पाटण 90 (6592), फलटण 955 (25266), सातारा 317 (34716), वाई 71 (11427) व इतर 19 (1032) असे आजअखेर एकूण 162712 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (164), कराड 5 (631), खंडाळा 0 (131), खटाव 3 (407), कोरेगांव 2 (311), माण 2 (207), महाबळेश्वर 0(43), पाटण 1 (157), फलटण 1 (246), सातारा 9 (1019), वाई 1 (300) व इतर 0 असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3616 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 2257 Citizens In Satara Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT