Coronavirus esakal
सातारा

साताऱ्याला कोरोनाचा घट्ट विळखा; जिल्ह्यात 24 तासात 30 बाधितांचा मृत्यू

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) सुरू असला, तरी सलग चौथ्या दिवशी कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या वाढली आहे. रूग्णवाढीचा आकडा झटक्यात हजाराच्या खाली येत आहे, तर अचानक दोन हजाराच्या वर उसळी घेत आहे. त्यामुळे नेमकी जिल्ह्याची स्थितीत काय आहे? याबाबत सर्वसामान्य संभ्रमावस्थेत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2528 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली. (Corona Test Positive Of 2528 Citizens In Satara District Today)

जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असला, तरी सलग चौथ्या दिवशी कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. रूग्णवाढीचा आकडा झटक्यात हजाराच्या खाली येत आहे, तर अचानक दोन हजाराच्या वर उसळी घेत आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 50 (7314), कराड 172 (21709), खंडाळा 95 (10112), खटाव 167 (15075), कोरेगांव 146 (13787), माण 159 (10912), महाबळेश्वर 39 (3965), पाटण 67 (6502), फलटण 1253 (24311), सातारा 308 (34498), वाई 59 (11356 ) व इतर 13 (1013) असे आजअखेर एकूण 160554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढील प्रमाणे : जावली 0 (164), कराड 5 (626), खंडाळा 0 (131), खटाव 2 (404), कोरेगांव 2 (309), माण 4 (205), महाबळेश्वर 1(43), पाटण 1 (156), फलटण 1(245), सातारा 13 (1010), वाई 1 (299) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 2528 Citizens In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT