Coronavirus esakal
सातारा

साताऱ्यात मृत्यूतांडव सुरुच! जिल्ह्यात आजअखेर 3562 जणांचा मृत्यू, तर 158036 बाधित

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) वाढता संसर्ग थांबत नसल्याने अखेर प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन (Lockdown) सुरू केला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 27% एवढ्यावर असून निगेटिव्ह अहवालांचा पेंडिंग डाटा भरण्यात आल्याने तो प्रत्यक्ष अहवालात कमी दिसत आहे. मात्र, त्यावर न जाता आता बाधित वाढ रोखून जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी कडक लॉकडाउन पाळावा व स्वतःसह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी केलेय. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2675 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Corona Test Positive Of 2675 Citizens In Satara District Today)

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग थांबत नसल्याने अखेर प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू केला आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 125 (7264), कराड 228 (21537), खंडाळा 135 (10017), खटाव 283 (14908), कोरेगांव 158 (13641), माण 131 (10753), महाबळेश्वर 15 (3926), पाटण 111 (6435), फलटण 1071 (23058), सातारा 343 (34190), वाई 64 (11297 ) व इतर 11 (1000) असे आजअखेर एकूण 158036 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (164), कराड 9 (621), खंडाळा 1 (131), खटाव 8 (402), कोरेगांव 4 (307), माण 2 (201), महाबळेश्वर 0 (42), पाटण 0 (155), फलटण 0 (244), सातारा 9 (997), वाई 0 (298) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3562 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 2675 Citizens In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT