corona vaccination file photo
सातारा

लसीकरणात महाबळेश्वरची आघाडी; जाणून घ्या तालुक्याची स्थिती

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला जिल्ह्यात दिवसभरात 30 हजारांहून अधिक लसीकरण केले जात होते.

प्रशांत घाडगे

सातारा : सातारा जिल्ह्यात satara सुरुवातीच्या टप्प्यात काेराेना लसीकरण माेहिम covid19 vaccination drive वेगाने सुरू होते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्याला लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मोहीम मंदावल्याचे दिसते. जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 9 हजार 929 नागरिकांचे लसीकरण झाले असून, एकूण 33 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. coronavirus-marathi-news-33-percent-covid19-vaccination-drive-completed-satara

दरम्यान, जिल्ह्यात लशीच्या पहिला डोसचे सर्वांत जास्त लसीकरण महाबळेश्‍वर तालुक्‍यात 42 टक्के झाले असून, सर्वांत कमी माण तालुक्‍यात 19 टक्के आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डोसचे प्रमाण अल्प असून, महाबळेश्‍वर तालुका (11 टक्के) सोडल्यास सर्वच तालुक्‍यांचे लसीकरण 10 टक्‍क्‍यांहून कमी आहे.

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला जिल्ह्यात दिवसभरात 30 हजारांहून अधिक लसीकरण केले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आठवड्यात केवळ 20 ते 25 हजार लशीचे डोस उपलब्ध होत असल्याने मोहिमेला सतत ब्रेक लागत आहे. त्यामुळे, सुरुवातीला लसीकरणाची असणारी गती कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात 18 वर्षांपुढील 21 लाख 7 हजार 350 लोकसंख्या असून, त्यातील आतापर्यंत सुमारे 7 लाख 9 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये पहिला डोस पाच लाख 77 हजार 118 नागरिकांना देण्यात आला असून, दुसरा डोस एक लाख 17 हजार 568 नागरिकांना देण्यात आला आहे.

त्यामुळे 18 वर्षांपुढील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत लशीचा पहिला डोस 28 टक्के नागरिकांना देण्यात आला असून, दुसरा डोस केवळ 6 टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. याचबरोबर जिल्ह्यात सातारा, माण, कोरेगाव, खटाव, फलटण, वाई हे तालुके लसीकरणात मागे दिसतात. 18 ते 44 वयोगटातील केवळ 16 हजार 500 व्यक्तींचे लसीकरण झाले असून, 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दोन लाख 38 हजार 471 तर दुसरा डोस 28 हजार 646 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

तालुकानिहाय पुर्ण झालेले लसीकरण असे :

सातारा : 1,52,891

कऱ्हाड : 1,18,787

जावळी : 30,970

खंडाळा : 38,399

खटाव : 66,829

महाबळेश्‍वर : 27,820

कोरेगाव : 54,219

माण : 35,436

पाटण : 76,421

फलटण : 65,664

वाई : 42,493

एकूण : 7,09,929

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT