सातारा

'कराड जनता'च्या 296 कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा 

सचिन शिंदे

कऱ्हाड : कराड जनता सहकारी बॅंकेच्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावरील चार कोटी 62 लाख 87 हजारांच्या कर्ज प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, असा आदेश येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अजित कुलकर्णी यांनी नुकताच दिला. त्याबाबत बॅंकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांच्यासह 296 कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. 
कराड जनता बॅंकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी न्यायालयात फिर्यादी दिली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नावाने दिलेल्या कर्जाची रक्कम बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर यांनी त्यांच्या मित्रांच्या कर्ज खात्यात भरली आहे, असे स्पष्टपणे म्हटले आहे. 

न्यायालयात फिर्याद देण्यापूर्वी त्यांनी पोलिसांकडेही त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीत तत्कालीन संचालक मंडळासह बॅंकेचे अधिकारीही यांनी संगनमत करून चार कोटी 62 लाख 87 हजारांची रक्कम कर्मचाऱ्यांवर दबाव आणून उचलली आहे, असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. कर्जाची रक्कम वर्ग करून ती खाती बंद केली आहेत. त्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्या सगळ्याचा तपास करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

दरम्यान, कराड जनता बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीचा पोलिसांनी तपास करावा, त्याचा गुन्हा दाखल करावा, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. पोलिसांना ते आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकारांना दिली. 

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पाठीशी अजित पवार; कुणाच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही

प्रतीक्षा संपली! सरपंच निवडीसाठी विशेष सभा बाेलविण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Violence: नेपाळमधील तुरुंगात तीन कैद्यांचा मृत्यू; सुरक्षा दलांसोबत संघर्ष, १५ हजारांपेक्षा जास्त कैद्यांचे पलायन

Ramnagar Crime : घरासमोरच डोक्यात फावडा मारून खून; चार मुलांची आई निर्दयीपणे ठार, भाग्यश्रीचा नवरा आहे गोव्यात कामाला..

Sangli GST Raid : सांगलीतील नेत्यावर ‘जीएसटी’चा छापा, बनावट बिलप्रकरणी कारवाई

Nepal Violence: पर्यटकांच्या माघारीसाठी प्रयत्न; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी विविध राज्यांच्या हालचाली

Nepal Protest: नेपाळमध्ये निदर्शकांनी पंचतारांकित हॉटेल पेटवलं, एका भारतीय महिलेचा मृत्यू, अनेक लोक अडकले

SCROLL FOR NEXT