सातारा

कोरोनाचा 670 गावांत संसर्ग, सातारा शहरासह 24 गावे बनली हॉटस्पॉट

उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत 670 गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 24 गावे कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत. आता कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याने बाधित रुग्ण सापडण्याचा आकडा दोनशेच्यावर पोचला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यातील 40 टक्के गावे कोरोनाच्या संसर्गात आली आहेत.
पांडवकालीन मेरुलिंग
 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 4052 वर गेला असून, प्रत्यक्ष 1863 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील 1739 गावांपैकी 670 गावांत कोरोना पोचलेला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी लक्षणे असलेले बाधित आढळत होते. आता सौम्य किंवा लक्षणेविरहित बाधित आढळत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढलेला आहे. जिल्ह्यात समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे दररोज शंभरच्यावर सापडणारी रुग्णसंख्या आता दोनशेवर गेली आहे. आणखी 15 दिवस संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. अद्याप एक हजार 49 गावांत कोरोनापासून दूर आहेत. याचे कारणही या गावांनी लॉकडाउन व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगली अंमलबजावणी केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 71 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, या अंतर्गत गावांत कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषद गटांत कोरोनाचे रुग्ण असल्याचे चित्र आहे.

'या' दुर्गम भागात लाॅकडाउनमध्येही इच वन टीच वन

शाहुपूरी, गाेडाेली, साेनापूरला सर्वाधिक कोरोनाबाधित; सातारा जिल्ह्यात 141 रुग्ण वाढले 

आता रुग्ण वाढू लागल्याने खासगी रुग्णालयांतही जास्त लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सौम्य आणि लक्षणे विरहित रुग्णांना कोरोना केअर सेंटर किंवा होम केअरमध्ये उपचार केले जाणार आहेत. अशा रुग्णांवर डॉक्‍टर लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी मोबाईल व व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही रुग्ण घरी थांबून डॉक्‍टरांचा सल्ला घेऊ शकणार आहे.


तालुकानिहाय बाधित गाव व रुग्णसंख्या 

  • जावळी 49
  • कऱ्हाड 119
  • खंडाळा 27
  • खटाव 45
  • कोरेगाव 48
  • महाबळेश्‍वर 20
  • माण 36
  • पाटण 76
  • फलटण 59
  • सातारा 118
  • वाई 73 

कोरोनाची संख्या वाढलेली गावे 

  • जावळी-पुनवडी, दुदुस्करवाडी, रामवाडी 
  • कऱ्हाड-मलकापूर, तारूख, वनवासमाची 
  • खंडाळा-शिरवळ, खंडाळा 
  • खटाव- वडूज 
  • कोरेगाव- वाठार किरोली 
  • महाबळेश्‍वर-गोडवली 
  • माण-म्हसवड, दहिवडी 
  • पाटण-नरळे, कासणी, कोयनानगर 
  • फलटण- फलटण शहर 
  • सातारा- सातारा शहर (लक्ष्मी टेकडी, गुरुवार पेठ), जिहे, कण्हेर, कोडोली, शाहूपूरी, गाेडाेली, साेनापूर 
  • वाई- सोनगिरवाडी, पसरणी, शेंदूरजणे 

     

दरम्यान काेराेनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून या बातमी नंतर देखील रुग्ण संख्या वाढली असल्याने तसेच उपचारानंतर रुग्ण घरी गेले आहेत. तरी काही गावांची संख्या वाढली आहे आणि कमी देखील झाली आहे याची वाचकांनी नाेंद घ्यावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Weekly Tarot Horoscope : 'या' आठवड्यात तयार होतोय गजकेसरी राजयोग; 4 राशींच्या सुखात होणार भरभराट !

Satara News : पुणे-बंगळुरु महामार्गावरील मोहिम फत्ते; वाहनधारकांचा जीव पडला भांड्यात!

Mumbai Metro: मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणार, कुठून कुठे असणार?

SCROLL FOR NEXT