सातारा

रुग्णालयातून कोरोनाबाधित पळाला अन् हकनाक कृष्णा नदीत जीव दिला!

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविड रुग्णालयानजीक आज (ता. ६) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

पाचवड (ता. वाई) येथील पासष्ट वयाच्या ज्येष्ठ नागरिक चाचणीमध्ये चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. शनिवारी रात्री त्यांनी मुलाला फोन करून माझी प्रकृती उत्तम आहे, मला आता घरी घेऊन जावा असे म्हणाले होते. मात्र, त्यांना कोरोना आजारामुळे नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता. 

पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातून कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा (ऑक्सिजन) काढून फेकून देऊन आरोग्य सेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून पळून गेले. डॉक्टर, आरोग्य सेविका व कर्मचारी यांनी पीपी किट घातल्यामुळे त्यांच्या मागे पळता येत नव्हते. पहाटे डॉ. विद्याधर घोटवडेकर यांना माहिती दिल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांनी रात्रगस्ती वरील पोलिसांच्या मदतीने पकडून रुग्णालयात आणले. त्यांना समजूत घालून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. या प्रकाराची नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. पुढील उपचारात त्यांना खाटेला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बंधन ठेवले होते. 

आपल्याला कोरोना झाला आहे, याचे त्यांना वाईट वाटत होते. त्यांनी घरी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, उपचार व इंजेक्शनचा डोस पूर्ण होईपर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दोन-तीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते. दरम्यान, आज (ता. ६) दुपारी त्यांनी पुन्हा कृत्रिम वायू (ऑक्सिजन) यंत्रणा काढून टाकली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांना त्यांना प्रतिबंध केला असता, त्यांनी स्वतःच्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली.

डॉ. घोटवडेकर व सहकारी कर्मचा-यांनी नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात आणले. परंतु, त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी गणपती घाटावर सिरीयलचे चित्रकरण सुरु असल्याने गर्दी होती. मात्र, त्यांना कोणीही उडी मारण्यापासून रोखले नाही आणि नंतर पाण्यातून काढताना कोणी मदत केली नाही. केवळ बघ्यांची गर्दी होती. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रेतील कनेक्टिव्हिटी वाढणार! 'तो' स्कायवॉक लवकरच सुरू होणार; पादचाऱ्यांना मोठा दिलासा

Numerology News: अंकशास्त्रातील ११, २२ आणि ३३ संख्यांचं रहस्य काय? हे भाग्यवान का मानले जातात? जाणून घ्या कारण...

Latest Marathi News Update : कोल्हापूरच्या पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयावरून वाद

Marathwada News : कन्नडमध्ये मकाच्या हमीभाव नोंदणीला मोठी दिरंगाई; सहापैकी फक्त दोनच केंद्रे सुरू!

Railway Update : पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी जुन्याच मार्गाची जोरदार मागणी; नव्या मार्गाला सर्वत्र विरोध!

SCROLL FOR NEXT