सातारा

जिल्हाधिका-यांचा आदेश; RTPCR किंवा RAT Test खासगी लॅबमधूनच करा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा शहरातील जिल्हा रुग्णालयात आज (शुक्रवार) सकाळपासून आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी झाली होती. केंद्र शासनाच्या निकषानूसार विविध खासगी कार्यालयात काम करणारे, खासगी वाहतुकदार आदी घटकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधितांना काम करण्यासाठी जाण्यासाठी या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असणे आवश्‍यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी ही तपासणी खासगी लॅबमधूनच करणे बंधनकारक केले आहे.
 
सर्व कामगारांचे भारत सरकराच्या निकषनूसार लसीकरण करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक आरटीपीआर चाचणी प्रमाणपत्र किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट नकारात्मक प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. तथापी, सरकारी यंत्रणेवर कोविड 19 बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचा ताण असल्यामुळे सर्व कामगारांचे आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट सरकारी यंत्रणेमार्फत न करता खाजगी स्तरावरील लॅबकडून करुन घ्यावी. हा नियम दहा एप्रिलपासून लागू राहणार आहे असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेशात नमूद केले आहे. 

दरम्यान राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून, आता कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपीड अँटिजेन, अँटीबॉडीज तपासणीचे दरही कमी करण्यात आले असून, अँटिजेन टेस्ट 150 रुपयांत करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी नुकतीच दिली.

पर्यटकांनाे! Covid 19 Test करुनच 'कास'ला या; आदेशाच्या अंमलबजावणीस प्रारंभ

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटिजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्‍चित करण्यात आले आहेत. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत अशी माहिती प्रांताधिकारी जगताप यांनी दिली.

चोऱ्या वाढल्या तर कोण जबाबदार, महाराष्ट्र शासन की जिल्हा प्रशासन? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT